मराठी बातम्या /बातम्या /पुणे /बारामती : सासरच्या दारातच केला लेकीचा अंत्यसंस्कार, छळ करून विष पाजून मारल्याचा संशय

बारामती : सासरच्या दारातच केला लेकीचा अंत्यसंस्कार, छळ करून विष पाजून मारल्याचा संशय

प्रतिकात्मक फोटो.

प्रतिकात्मक फोटो.

Pune Baramati News सासरच्या मंडळीनं मुलीचा छळ करून तिला विष पाजून मारल्याचा माहेरच्या मंडळींचा संशय आहे. त्यामुळं रागाच्या भरात माहेरच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे सासरच्या दारातच मुलीचा अंत्यसंस्कार केला.

बारामती, 28 मे : लेकीचा मृत्यू (Daughter Death) झाल्यानंतर सासरच्या दारामध्येच तिच्या पार्थिवावर माहेरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार (Cremated at front of in laws house) केले. बारामती तालुक्याच्या सांगवी (Baramati) या गावात हा प्रकार घडला. सासरच्या मंडळीनं मुलीचा छळ करून तिला विष पाजून मारल्याचा माहेरच्या मंडळींचा संशय आहे. त्यामुळं रागाच्या भरात माहेरच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे सासरच्या दारातच मुलीचा अंत्यसंस्कार केला.

(वाचा-वेशांतर करून चोरायचे सोनसाखळ्या; पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत केलं जेरबंद)

सांगवी येथील गीतांजली नावाच्या विवाहितेच्या पोटात विषारी औषध गेल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर सुरुवातीला तिच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला पुण्यात उपचारासाठी नेण्यात आलं. ससून रुग्णालयात या विवाहितेवर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान या विवाहितेचा मृत्यू झाला.

(वाचा-Jalna : प्रेम प्रकरणात आई वडिलांचा अपमान, फेसबूक LIVE करत तरुणाची आत्महत्या)

गीतांजलीच्या पती, सासू, नणंद, सासरे यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून जबरदस्तीनं तिला विषारी औषध पाजल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळं मुलीचा खून केल्याचा आरोप करत सासरच्या घरासमोरच गीतांजलीच्या पार्थिवावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती.

बारामती तालुका पोलिसांनी या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण वातावरण तणावाचं होतं. पोलिसांनी तसेच इतर मंडळींनी माहेरच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचंही काहीही ऐकलं नाही, आणि गीतांजलीच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Baramati, Crime news, Pune crime