Home /News /pune /

राष्ट्रपती पदकासाठी पुण्यातील पोलिसाचा कारनामा; आता तुरुंगात जाण्याची आलीये वेळ

राष्ट्रपती पदकासाठी पुण्यातील पोलिसाचा कारनामा; आता तुरुंगात जाण्याची आलीये वेळ

पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच चक्क खोटी कागदपत्रं तयार केल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे.

    पुणे, 11 मार्च : भारतात पोलीस दलातील (Police Department) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने (President's Medal) सन्मानित केलं जातं. हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. दीर्घकाळ उत्तम सेवा बजावणाऱ्या, स्वच्छ कारकीर्द असलेल्या कर्मचाऱ्यांना यासाठी अर्ज करता येतो. हे पदक मिळवण्यासाठी पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच चक्क खोटी कागदपत्रं तयार केल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे. द इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. गणेश अशोक जगताप (Ganesh Jagtap) असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, त्यानी लिपिक (Clerks) रवींद्र धोंडिबा बांदल आणि नीतेश अरविंद अयनूर यांच्या मदतीनं आपल्या सेवा पुस्तिकेत (Service Book) बदल केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) वरिष्ठ लिपिक प्रताप भोसले (Senior Clerk) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत हवालदार पदावर कार्यरत असलेला गणेश जगताप 2019 मध्ये वानवडी पोलिस स्टेशनमध्ये डेबुक इनचार्ज (Daybook In charge) म्हणून कार्यरत होता. त्या आधी फेब्रुवारी 2018 मध्ये त्याला कर्तव्य योग्यरित्या न पार पाडल्याबद्दल शिक्षा भोगावी लागली होती. या शिक्षेनुसार (Punishment) त्याची पगारवाढ (Salary Hike) दोन वर्षांसाठी थांबवण्यात आली होती आणि या शिक्षेचा तपशील त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये म्हणजेच सेवा पुस्तिकेत नोंदवण्यात आला होता. या पुस्तिकेत कर्मचाऱ्यांच्या कामाचा लेखा-जोखा नोंदवला जातो. राष्ट्रपती पदकासाठी (President's Medal) अर्ज करण्याकरता अर्जदाराचं सेवा पुस्तक कार्यतत्पर असल्याच्या शेऱ्यांनीयुक्त असणं आवश्यक असतं. त्यात कर्मचाऱ्याला कोणतीही शिक्षा किंवा दंड झाल्याची नोंद असल्यास तो या पुरस्कारासाठी अपात्र मानला जातो. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्याला कोणतीही शिक्षा किंवा चौकशीचा सामना करावा लागलेला नाही, असं शपथपत्रदेखील कर्मचाऱ्याला दाखल करावं लागतं. जगतापला आपल्या सेवा पुस्तिकेतील या शिक्षेच्या नोंदीमुळे राष्ट्रपती पदकासाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे जगतापने वानवडी पोलीस ठाण्यातील दोन लिपिक आणि डेबुक इन्चार्ज यांच्या मदतीने आपल्या सेवा पुस्तिकेतील नोंदी बदलण्याचा कट रचला. त्यानुसार 26 जुलै 2017 आणि 29 जानेवारी 2020 दरम्यान त्यानी आपल्या सेवा पुस्तिकेतील तपशीलात बदल घडवून आणले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे ही वाचा-पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISISशी संबंधित एकाला अटक, संवेदनशील वस्तू जप्त यासाठी जगतापनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट सरकारी शिक्के वापरून शिक्षेचा उल्लेख नसलेली बनावट सेवा पुस्तिका तयार केली. त्यानंतर जगतापने आपलं सर्व्हिस रेकॉर्ड स्वच्छ असल्याचं शपथपत्र दाखल करत राष्ट्रपतिपदकासाठी अर्ज सादर केला, अशी माहितीही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली. मात्र जगतापचा हा खोटेपणा उघडकीस आला असून, त्याच्या आणि त्याला या कामात मदत करणाऱ्या तिघांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.
    First published:

    Tags: Crime news, Online fraud, Pune

    पुढील बातम्या