पुणे, 1 नोव्हेंबर: भारतीय लष्कराच्या (Indian Army) परीक्षेत पास करून देतो, असं सांगून अनेक तरुणांना गंडवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात राजस्थानच्या एजंटसह लष्करातील एका लिपिकाला अटक करण्यात आली आहे.
फेब्रुवारीत शारीरिक चाचणी घेतल्यानंतर रविवारी वानवडीच्या एआयपीटीच्या मैदानावर लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षेत पास करून देतो असं सांगून आरोपींनी 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सकरण्यात आला आहे.
हेही वाचा..मोठा अनर्थ टळला! एकनाथ खडसे बालंबाल बचावले, धावत्या वाहनाचं फुटलं टायर
रवींद्र राठोड (एजंट, राजस्थान) आणि जयदेव सिंह परिहार ( लिपिक, रिक्रुटमेंट ऑफिस ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. वानवडी येथे होणाऱ्या लष्करी भरतीच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याचं आमिष दाखवून 30 उमेदवारांची लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लष्करातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केला. आरोपींनी पोलीस चौकशी गुन्हा कबूल केला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेली माहिती अशी की, आरोपी जयदेव सिंह परिहार यांनी कॅम्प येथील लष्कराच्या कार्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास आलेल्या काहींना आपल्या जाळ्यात हेरलं होतं. आपली लष्करात मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. लेखी परीक्षेत मी तुम्हाला पास करून देतो. तुमचं काम झाल्यावर प्रतेकी एक ते दोन लाख द्या, असं सांगून जयदेव सिंह परिहार यांनं 30 उमेदवारांचे मूळ कागदपत्र स्वत: च्या ताब्यात घेतले होते.
हेही वाचा..मिस्टर परफेक्शनिस्टविरोधात तक्रार; भाजप नेता म्हणतो, 'हा नियम मोडला'
एवढंच नाही तर गेल्या 15 दिवसांपासून लोहगाव येथे एक शिक्षक नियुक्त करून उमेदवारांचे क्लास घेण्यात येत होते, अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 व युनिट 5 दोन पथके व आर्मी इंटेलिजन्सचे आधिकारी व स्टाफ यांनी संयुक्त कारवाई केली.
या प्रकरणात अक्षय महेश साळुंखे याच्या तक्रारीवरून वानवडी येथे भादंवि 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.