हर्षवर्धन जाधव प्रकरणाला वेगळं वळण, मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा

हर्षवर्धन जाधव प्रकरणाला वेगळं वळण, मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा

या प्रकरणातील सहआरोपी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा देखील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत.

  • Share this:

पुणे, 18 डिसेंबर : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्या औंध मारहाण प्रकरणी रोज नवनवे खुलासे आणि आरोप होताना दिसत आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि जाधव खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा सणसणाटी आरोप त्यांच्या वकीलांनी केला आहे. तसंच या प्रकरणातील सहआरोपी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा देखील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत.

हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी दानवेंवर आरोप केला असला तरी हल्ला करणारा नगरसेवक हा काँग्रेसचा आहे. या प्रकरणानंतर हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शाब्दिक हल्ले चढवले आहेत.

मैत्रिणीची काय आहे प्रतिक्रिया?

'मी हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण असून सध्या आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत आहोत. व्यावसायिक कामासाठी जात असताना आमच्यासोबत हा प्रकार घडला. आमच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट असावा, असं एकंतरीत तिथल्या परिस्थितीवरून वाटतं आहे,' असं इशा झा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्या अमन चड्डा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. हर्षवर्धन जाधव यांनी माझ्या आई वडिलांना मारहाण केल्यामुळेच आम्ही फिर्याद दिली आहे. त्यानंतरचा तपास पोलीस करत आहेत. यापेक्षा अधिक आम्हाला काहीही बोलायचं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. शहरातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत अमन अजय चड्डा यांनी फिर्याद दिली होती. किरकोळ अपघाताच्या वादातून जाधव यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अमन अजय चड्डा यांनी केला आहे.

याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 15 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादातून दुचाकीस्वाराला जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून ते भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावईदेखील आहेत.

अटक टाळण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून छातीत दुखत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी ससून रुग्णालयात तपासणी करून त्यांना रिसतर अटक केली.

Published by: Akshay Shitole
First published: December 18, 2020, 6:12 PM IST

ताज्या बातम्या