पुणे, 28 मे: पुण्यातील कोरोना स्थितीचा (Coronavirus in Pune) आढावा आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी घेतला. यानंतर पत्रकारासोबत संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे आता प्रत्येक रुग्णालयाच्या बिलाची तपासणी होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूट थांबण्यास नक्कीच मदत होईल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती समाधानकारक आहे. ट्रॅकिंग आणि टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. संस्थात्मक विलगीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि गरज पडेल त्या ठिकाणी नवीन केंद्र सुरू करण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्णालयातील बिल तपासण्यात येणार, ऑडिटर नेमण्याचे आदेश
प्रत्येक रुग्णालयातील बिल तपासण्यात येणार आहेत. रुग्णालयांत ऑडिटर नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात लसीकरण दर वेगवेगळे ते नियमित करण्याचा विचार सुरू आहे. यासोबतच महात्मा फुले आरोग्य योजनेचा विमा दीड लाखाचा असला तरी त्यावर जरी खर्च लागला तर तो खर्च सरकार देणार असा अध्यादेश काढण्यात आला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे.
अजून Go Slow असंच जावं लागेल, जाणून घ्या Lockdown बाबत नेमकं काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे
राजेश टोपेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
पुण्यात परिस्थिती समाधानकारक
9.11 पॉझिटिव्हिटी रेट आहे
राज्यात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पध्दतीने व्हायला हवे
टेस्टिंग ची संख्या कमी होता नये
पुण्यात सर्वात जास्त चाचण्या, त्या तश्याच राहिल्या पाहिजे. होम आयसोलेशन कमी झाले पाहिजे इन्स्टिट्युशनल आयसोलेशन वाढले पाहिजे
गावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर उघडले पाहिजे
प्रत्येक बिल तपासलं पाहिजे.
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑडिटर हवा आहे
पुणे प्रशासनाने 9 कोटी रुपयांचे बिल रुग्णांना कमी करून दिले
म्युकर मयकोसीस जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्यांचे उपचार मोफत करण्यात येणार
खासगी रुग्णालय लसीसाठी जास्त दर आकारण्यात येतोय. त्यांना योग्य दर लावण्याबाबत आवाहन करू. मात्र हे रुग्णालय थेट
कंपन्यांकडून लस खरेदी करतात त्यावर राज्यसरकार अंकुश ठेवू शकत नाही
कंपन्यांनी आपल्या कामगारांना स्वतःच्या खर्चाने लसीकरण करण्यात यावे
लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढवण्यात आला मात्र नवीन नियम 1 तारखेला जाहीर करण्यात येतील
पुण्यातला शनिवार रविवार चा लॉकडाऊन काढून टाकले, या दिवशी देखील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
राज्य सरकार उन्नती उपक्रम सुरू करत आहोत. सी एस आर माध्यमातून सॅनिटरी पॅड वाटप करणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Rajesh tope