राजगडावरील प्रस्तावित रोपवेला दुर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींचा विरोध; प्रकल्प रेटला तर आंदोलन

पर्यावरणीय प्रभाव माहीत नसताना केवळ पर्यटनाच्या दृष्टीने रोप-वे प्रकल्प केला तर गडाच्या तटबंदीसह किल्ल्याला धोका पोहचू शकतो, असा दावा करत दुर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी, पुरातत्वशास्त्र अभ्यासक यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

पर्यावरणीय प्रभाव माहीत नसताना केवळ पर्यटनाच्या दृष्टीने रोप-वे प्रकल्प केला तर गडाच्या तटबंदीसह किल्ल्याला धोका पोहचू शकतो, असा दावा करत दुर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी, पुरातत्वशास्त्र अभ्यासक यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

  • Share this:
पुणे, 18 जून : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड येथील प्रस्तावित रोपवे वादात सापडला आहे. युनेस्कोने नॉमिनेशन केलेल्या 14 किल्ल्यांच्या यादीत सामरिक महत्व असलेल्या राजगड किल्ल्याचा (Rajgad ropeway) पुरातत्व खात्यातर्फे सर्व्हे झालेला नाही. पर्यावरणीय प्रभाव (environmental impact assessment) माहीत नसताना केवळ पर्यटनाच्या दृष्टीने रोप-वे प्रकल्प केला तर गडाच्या तटबंदीसह किल्ल्याला धोका पोहचू शकतो, असा दावा करत दुर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी, पुरातत्वशास्त्र अभ्यासक यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. हा प्रकल्प रेटला तर आंदोलन आणि प्रसंगी न्यायालयात जायचा इशारा देण्यात आला आहे. चिलखती तटबंदी असलेल्या राजगड किल्ल्याचे बांधकाम 2 टप्प्यात म्हणजे गडाच्या 3 माच्या आणि त्यावर बाले किल्ला असं आहे. किल्ल्याच्या घेऱ्यातील जंगल यामुळं किल्ल्याला वेगळं महत्व आहे. किल्ले राजगड हा दुर्गम असून तो दुर्गमच ठेवावा, किल्ला संवर्धन करण्यासाठी मॅरेथॉन वगैरे पर्यावरणस्नेही उपक्रम राबवावेत. पुरातत्त्वशास्त्र  आणि पर्यावरण इम्पॅक्ट सर्व्हे करावेत, अशा मागण्या करत दुर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी रोप-वेला तीव्र विरोध केला आहे. आधी संवर्धन मग संरक्षण आणि नंतर पर्यटन असा क्रम असावा, असं रोखठोक मत प्रसाद दांगट पाटील-गड किल्ले संवर्धन समिती अध्यक्ष आणि सायली दातार पलांडे, पुरातत्वशास्त्र अभ्यासक,पर्यावरण प्रेमी यांनी मांडले. राजगडमध्ये उत्खनन झालंय का, पुरातत्त्व खात्याची परवानगी आहे का? कमी जागेत रोप-वे प्रकल्प कसा राबवणार?गडावर फक्त चहा, पाणी मिळणार असं सांगितलं जातंय. मात्र, गर्दी झाली तर काय राजगडाची carrying capacity जास्त नसताना क्षमतेपेक्षा अधिक लोक आले तर काय असे एक ना दोन..अनेक प्रश्न दुर्गप्रेमींनी उपस्थित केले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात राजगड किल्ला येतो. राजगडचा सिंहगड होऊ देऊ नका, अशा  भावना दुर्गप्रेमी, गिर्यारोहक यांच्या आहेत. यावर सुप्रिया सुळे यांना तुमचं मत काय? असा प्रश्न करण्यात आला होता. या प्रश्नावर सुळे यांनी प्रस्ताव काय ते पाहते, स्थानिक नागरिकांशी बोलते, मग मत व्यक्त करते असं उत्तर त्यांनी दिलं आहे. हे वाचा - 12 वर्षीय मुलीसोबत लग्न करण्यासाठी आला होता 50 वर्षीय घोडनवरा, गावकऱ्यांनी चांगलाच धोपटला राजगडचं ऐतिहासिक, सामरिक आणि वारसा (हेरिटेज ) महत्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गड किल्ले प्रेमी आहेत. तर पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरे ज्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा कारभार आहे, हे दोघे याबाबत योग्य निर्णय  घेणार का? याकडे दुर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: