इंजिनिअर महिलेस अश्लील शिविगाळ, अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

इंजिनिअर महिलेस अश्लील शिविगाळ, अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नगरसेवक जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड,19 मार्च: पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नगरसेवक जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप नगरसेवक जावेद शेख यांच्यावर करण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

प्रभागातील विकास कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि श्रेय दुसरे नगरसेवक कसे काय घेऊन जातात. मी आजवर 40 ते 50 गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही करु शकत नाहीस. मी साईटवर आल्याशिवाय एक वीटही हलली तरी मी तुमच्याकडे बघून घेईन, अशी धमकी देत संबधित इंजिनिअर महिला कर्मचाऱ्यास जावेद शेख यांनी अश्लील भाषा वापरून दम भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी शेख ह्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा..

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं उचललं कठोर पाऊल

शाहरुख खान ठरला Hyundai Creta चा पहिला मालक, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फिचर्स

कोरोना संशयित तरुणाने संपवलं आयुष्य, रुग्णालयाच्या इमारतीवरुन घेतली उडी

First published: March 19, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या