कोविड हॉस्पिटलचा कर्मचारीच करत होता remdesivir injection चा काळाबाजार, पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोविड हॉस्पिटलचा कर्मचारीच करत होता remdesivir injection चा काळाबाजार, पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे क्राईम ब्रँचने रितसर बनावट ग्राहक पाठवून या आरोपीला पाच हजारांचे इंजेक्शन सात हजारांना विकताना रंगेहात अटक केली.

  • Share this:

पुणे, 11 एप्रिल : पुण्यात (Pune Corona Update) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. त्यातच रेमडीसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) तुटवडा निर्माण झाला आहे. अशा या परिस्थितीत रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) एका आरोपीला अटक केली. तसंच चौकशीसाठी एका नामांकीत हॉस्पिटलच्या नर्सला देखील ताब्यात घेतले आहे. रेमडीसिव्हीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज संदीप मुळीक (वय 22, रा. साई प्रसाद सोसायटी दत्तनगर पुणे) असं या आरोपीचं नाव आहे. पुणे क्राईम ब्रँचने रितसर बनावट ग्राहक पाठवून या आरोपीला पाच हजारांचे इंजेक्शन सात हजारांना विकताना रंगेहात अटक केली. या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी क्राॅईम ब्रांचने पोलिसांच्या दहा पथकांची स्थापना केली आहे. डीसीपी श्रीनिवास घाडगेपाटील यांनी न्यूज18 लोकमतला ही माहिती दिली.

...म्हणून भाजपानं 6 वेळा माझं तिकीट कापलं! अमित शहांचा खुलासा

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडीसीवीर इंजेक्शन अधिक किंमतीत विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली. त्याच्याकडे केलेला अधिक चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची नर्स मैत्रीणीकडून हे इंजेक्शन घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्या नर्सचीही चौकशी सुरू केली असता या दोघांच्या माहितीमध्ये आणखी भलतीच नावं समोर येताना दिसत आहेत.

दगडाने ठेचून केली वृद्धेची हत्या; गावाबाहेर नेऊन पुरले, पण...

तसंच अटकेतील आरोपीहा कोविड हॉस्पिटलचा कर्मचारीच निघाला आहे. म्हणूनच पोलिसांनी या रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं ठरवलंय. राज्यभरातले गंभीर कोरोना रूग्ण उपचारासाठी पुण्यात येत असल्याने शहरात अचानकपणे रेमडीसीवीरच्या मागणीत वाढ झाली. त्याचाच गैरफायदा उचलत काही एजंट लोकांनी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला. रेमडीसीवीर इंजेक्शनचा हाच काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याकरिता पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 11, 2021, 5:16 PM IST

ताज्या बातम्या