Home /News /pune /

लाजीरवाणी आणि संतापजनक; pune gang rape प्रकरणावर अजित पवार संतापले, म्हणाले...

लाजीरवाणी आणि संतापजनक; pune gang rape प्रकरणावर अजित पवार संतापले, म्हणाले...

'सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल'

'सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल'

'सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल'

    पुणे, 07 सप्टेंबर : पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या ( pune gang rape case)  घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींना तातडीने अटक करण्यात आली आहे उर्वरीत आरोपींना अटकेची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भारी! फक्त बटाटे खाण्यासाठी 50 हजार पगार; कसं कराल या ड्रिम जॉबसाठी अप्लाय पाहा पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. आणखी 6 जणांना अटक दरम्यान, वानवाडी गँगरेप प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून पीडित अल्पवयीन मुलीवर एकूण 13 जणांनी बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आणखी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.  वानवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र, रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतलं आणि वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. सुरुवातील सहा रिक्षाचालक आणि दोन रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी या पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती. IND vs ENG : 5 वर्षांपूर्वी मोदींनी कौतुक केलं, विराटने पुन्हा तेच काम केलं! पण, आज पोलीस तपासातून संतापजनक माहिती समोर आली. वानवडी पोलिसांनी आणखी 6 जणांना अटक केली आहे. यापैकी 5 जणांनी बलात्कार केला होता. एकूण तेरा जणांनी पीडितेवर अत्याचार केला आहे. तर मुलीला मुंबईहून सोबत घेऊन जाणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे. पीडित  मुलगीही अल्पवयीन असल्याने अटक केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ajit pawar

    पुढील बातम्या