मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात एल्गार परिषद होणारच, बी.जी. कोळसे पाटलांनी जाहीर केली नवी तारीख

पुण्यात एल्गार परिषद होणारच, बी.जी. कोळसे पाटलांनी जाहीर केली नवी तारीख

राज्य सरकारनं सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असा देखील इशारा कोळसे-पाटील यांनी दिला आहे.

राज्य सरकारनं सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असा देखील इशारा कोळसे-पाटील यांनी दिला आहे.

राज्य सरकारनं सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असा देखील इशारा कोळसे-पाटील यांनी दिला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

पुणे, 31 डिसेंबर: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग असून अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवू नये, असे सरकारचे आदेश आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना देखील मनाई करण्यात आली असताना मात्र, एल्गार परिषदेचे (Elgar Parishad) आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील (b g kolse patil) यांनी पुण्यात एल्गार परिषद (Pune) होणारच, अशी घोषणा केली आहे. एवढंच नाही तर परिषदेची नवी तारीख देखील त्यांनी जाहीर केली आहे.

हेही वाचा..राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, सूत्रांची माहिती

येत्या 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येईल, अशी घोषणा बी.जी. कोळसे-पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारनं सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असा देखील इशारा कोळसे-पाटील यांनी दिला आहे. शेवटी जेलभरोची आमची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, यापूर्वी 1 जानेवारीला पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद (elgar parishad) होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, अशी मागणीही स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली होती.

कोळसे पाटील म्हणाले, अन्न वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्य शिक्षण याभोवती राजकारण फिरायला हवं.  मात्र हिंदू-मुस्लिम, लव्ह-जिहाद, जात-पात- धर्मानुसार राजकारण फिरत आहे. याचा लढा आम्ही अनेक वर्षांपासून करत आलो आहे. यापुढेही तो कायम राहील. लोकशाहीवादी, आंबेडकरवादी युवावर्गच पुढे येऊन काम करत असल्याचंही कोळसे पाटील यांनी सांगितलं.

कुठलही सरकार आलं तरी मनुवादी विचाराने बुरसटलेलेच...

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो दाखवतो. सरकार कुणाचही आलं तरी बाटली जुनी आहे पाणी नवीन आहे. कुठलंही सरकार आलं तरी मनुवादी विचाराने बुरसटलेलेच असल्याची टीका कोळसे पाटील यांनी यावेळी केली.

राज्यात नवीन सरकार आलं आणि त्यांनी माझी सिक्युरिटी काढून घेतली. ज्या संस्थांवर लोकशाही अवलंबून त्या कशा काम करताय हे मला माहिती आहे. देशात जाती धर्माची कीड लागली त्यातून कसा बाहेर निघणार हा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोळसे पाटील यांनी चिंता व्यक्त केली.

दरवर्षी 31 डिसेंबरला आम्ही एल्गार परिषद घेत असतो.  त्याचा मी संयोजक आहोत आणि राहणार. एल्गार परिषदेला आमचा एकही पैसा लागला नाही. आमच्यावर कुठं बंधन घातली, खोटे आरोप केले. मूलभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि क्वालिटी शिक्षण मिळावे यासाठी एल्गार परिषदचे आयोजन करत आहे, अशीही माहिती कोळसे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, माझ्याकडे सगळ्या संस्था येऊन गेल्या. काही हाती लागलं नाही.  ईडी आली तर ती वेडी होईल, अशा शब्दांत कोळसे पाटील यांनी टीका केली.  नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा वाईट काय असू शकतं? असं त्यांनी सांगितलं.  एल्गार परिषदेत ज्याना अटक केली त्यांना सोडा नाहीतर सुप्रीम कोर्टवर मोर्चा न्या, मला वेळ मिळाला तर मी पण सहभागी होईन, असाही इशारा कोळसे पाटील यांनी यावेळी दिला.

First published: