Home /News /pune /

बाजीरावांच्या 'मस्तानी'च्या स्मृतीस्थळाला अकरा वंशजांची भेट

बाजीरावांच्या 'मस्तानी'च्या स्मृतीस्थळाला अकरा वंशजांची भेट

त्या दोघांची प्रेमकहानी इतिहासात अजरामर झाली आहे. त्यावर अनेक कथा, कादंबऱ्या आल्यात. नंतर मालिका आणि चित्रपटही आलेत. अशा या मस्तानीची समाधी ही पुणे जिल्ह्यातल्या पाबळ इथं आहे.

    रायचंद शिंदे, शिरूर 07 जानेवारी : रणवीर आणि दीपीकाच्या बाजीराव-मस्तानीमुळे पेशव्यांच्या काळातली ऐतिहासिक आणि अमर प्रेम कहानी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. रणांगणावर शौर्य गाजविणारा बाजीराव मनाने हळवा होता. नृत्यांगणा असेल्या मस्तानीच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता. त्या काळात बाजीरावा सारख्या राजपुरुषाने धर्मानं वेगळ्या असलेल्या एका नृत्यांगणेच्या प्रेमात बुडावं हीच गोष्ट मोठी होती. त्या दोघांची प्रेमकहानी इतिहासात अजरामर झाली आहे. त्यावर अनेक कथा, कादंबऱ्या आल्यात. नंतर मालिका आणि चित्रपटही आलेत. अशा या मस्तानीची समाधी ही पुणे जिल्ह्यातल्या पाबळ इथं आहे. त्या स्मृती स्थळाला मस्तानीच्या अकरा वंशजांनी आज भेट दिली. पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील मस्तानीच्या स्मृस्तीस्थळाला आज मंगळवारी दुपारी मस्तानीच्या अकरा वंशजांनी भेट दिली. मध्यप्रदेश येथे राहणारे मस्तानी चे वंशजांची ही सातवी आणि आठवी पिढी आहे. मस्तानी वर आधारीत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी सोमवारी शनिवार वाड्याला भेट दिली व मंगळवारी मस्तानीच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मस्तानी यांचे वंशज नवाब इरफान अली बहादूर, तमकीन अली जोश बहादूर, झुबेर अली जोश बहादूर, दरुकीन अली बहादूर, उस्मान अली बहादूर, सना अली बहादूर, फिरोजा सुल्तान, उजरे अली बहादूर, अल्मास बहादूर सोबत होते. बहादूर कुटुंबातल्या सदस्यांनी एवढ्या संख्येने एकत्र येत पहिल्यांदाच शनिवारवाडा व पाबळ येथील समाधीला भेट दिली. पुण्यात आल्यावर भरपूर प्रेम मिळाले, अशी भावना या वंशजांनी व्यक्त केली. शनिवारवाड्यासह केळकर संग्रहालय, रास्ते वाडा या ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Bajirao mastani

    पुढील बातम्या