Home /News /pune /

आता त्रास सहन होईना, कर्वेनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; पुणे हादरलं!

आता त्रास सहन होईना, कर्वेनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; पुणे हादरलं!

वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे कर्वेनगर भागात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे

पुणे, 29 जुलै : पुण्यात दोन दिवसांपूर्वी बंद घरात वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आज पुण्यातील  कर्वेनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्याची खळबळजनक घटना घडली आहे. अविनाश हेमंत गोरे (वय 69)  आणि  वैशाली हेमंत गोरे (वय 64 ) अशी मृत्यू झालेल्या वृद्धांची नाव आहे. गोरे दाम्पत्य हे कर्वेनगर भागात विष्णू संकूल येथे स्वत: मालकीच्या प्लॅटमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आपल्या पतीसह राहते. गेल्या काही दिवसांपासून दोघांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अविनाश गोरे हे बँकेत कर्मचारी होते. निवृत्त झाल्यानंतर आपल्या पत्नीसह याच घरी राहत होते. आज सकाळी मोलकरीण नेहमीप्रमाणे घरकामासाठी आली होती. त्यावेळी अविनाश आणि वैशाली यांचा मृतदेह घरात आढळून आला. अविनाश यांनी आत्महत्या केली होती. तर खोलीत वैशाली यांचा मृतदेह आढळून आला होता. पुण्यात कोरोनाने ओलांडली धोक्याची पातळी, धक्कादायक आकडेवारी समोर या घटनेची माहिती अलंकार पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलिसांनी घराची पाहणी केली असता त्यांना त्यावेळी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रक्षाबंधनच्या तोंडावर भावाने तोडले नाते, बहिणीचा गळा दाबून केला खून घटनास्थळी अविनाश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी वैशाली यांचा गळा आवळला आणि त्यानंतर स्वत:ची जीवनयात्रा संपवली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. परंतु, वैशाली यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे कर्वेनगर भागात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा  अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या