Home /News /pune /

'एकच नारा जय श्रीराम' Vs 'एकच वादा अजितदादा', भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी,VIDEO

'एकच नारा जय श्रीराम' Vs 'एकच वादा अजितदादा', भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी,VIDEO

पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाले.

पुणे, 01 जानेवारी : पुण्यात (Pune) नववर्षाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे एकाच व्यासपीठावर आले. पण, अपेक्षेप्रमाणे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पण महापालिकेच्या सभागृहात अजित पवार जात असताना भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी पुणे शहराची 'ताकद गिरीश बापट' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'दादा दादा' घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. 'एकच नारा जय श्रीराम जय श्रीराम' अशा घोषणाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याला उत्तर म्हणून 'एकच वादा अजितदादा अजितदादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, NCP, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या