मराठी बातम्या /बातम्या /पुणे /हलाखीमुळे दहावीपर्यंत शिकले, आता ज्ञानेश्वर बोडखे शेतीतून करतात लाखोंची कमाई

हलाखीमुळे दहावीपर्यंत शिकले, आता ज्ञानेश्वर बोडखे शेतीतून करतात लाखोंची कमाई

असंख्य शेतकऱ्यांसाठी शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असताना एकजण याला अपवाद ठरला आहे. या तरुणाची कथा अनेकांसाठी प्रेरक आहे.

असंख्य शेतकऱ्यांसाठी शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असताना एकजण याला अपवाद ठरला आहे. या तरुणाची कथा अनेकांसाठी प्रेरक आहे.

असंख्य शेतकऱ्यांसाठी शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असताना एकजण याला अपवाद ठरला आहे. या तरुणाची कथा अनेकांसाठी प्रेरक आहे.

मुळशी, 21 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील (Pune District) मुळशी (Mulshi) तालुक्याचे ज्ञानेश्वर बोडखे यांनी शेतीत अनोखा प्रयोग करत अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपलं बालपण घालवणाऱ्या बोडखे यांनी ही किमया कशी साधली याची उत्सुकता तुमच्याही मनात निर्माण झाली असेल.

ज्ञानेश्वर यांना शिकून-सावरून काहीतरी बनायचं होतं. मात्र घरी कमावणारं कुणी नव्हतं. दहावीनंतर त्यांनी शिक्षण सोडलं. एका ओळखीच्या माणसाच्या माध्यमातून त्यांनी ऑफिस बॉयची (office boy) नोकरी धरली. घरखर्च चालू लागला. त्यांनी दहा वर्ष ही नोकरी केली आणि मनाशी काहीतरी ठरवून परत गावी आले.

गावी येत त्यांनी बँकेकडून लोन (Bank loan) घेतलं आणि फुलांची शेती सुरू केली. आज ज्ञानेश्वर लाखोंमध्ये कमावतात. एवढंच नाही तर शेकडो शेतकऱ्यांना त्यांनी रोजगार दिला. ज्ञानेश्वर सांगतात, 'मी पेपरमध्ये पॉलिहाऊस शेतीबाबत (polyhouse farming) वाचलं होतं. एका शेतकऱ्याची ती यशकथा होती. हा शेतकरी पॉलिहाऊसच्या माध्यमातून शेती करून वर्षाला 12 लाख रुपये कमावत होता. मला वाटलं, तो हे करू शकतो तर मी का नाही?'

हा विचार करून ज्ञानेश्वर गावी गेले तेव्हा अनेकांनी त्यांना हे करण्यापासून रोखलंसुद्धा. शेतीतून फायदा होऊ शकतो यावर लोकांचा विश्वास नव्हता. मात्र ज्ञानेश्वर मागे हटले नाहीत. पुण्यात आयोजित करण्यात आलेला एक पॉलिहाऊसबाबतचा वर्कशॉपही त्यांनी अटेंड केला. मात्र या क्षेत्रात नवीन असल्यानं आधी अनुभव घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. ते एका पॉलिहाऊस शेती करणाऱ्याकडे कामाला जाऊ लागले.

तब्बल 17 किलोमीटर सायकल चालवत ते रोज तिथं जायचे. याचा त्यांना खूप फायदा झाला. आत्मविश्वासही आला. आता त्यांनी बँकेत लोन मिळवण्यासाठी अर्ज केला. थोडी धावपळ केल्यावर लोन मंजूर झालं. आता ज्ञानेश्वर यांनी स्वतःचं पॉलिहाऊस तयार करत तिथं गुलाब आणि इतर फुलांची लागवड केली. आधी स्थानिक बाजारात आणि मग पुण्याबाहेरही ज्ञानेश्वर फुलं विकण्यास पाठवू लागले.

एका वर्षात त्यांनी बँकेचं 10 लाखांचं लोन चुकतं केलं. फुलांची शेती ऐन भरात आलेली असतानाच अचानक या व्यवसायात मंदी आली. मात्र ज्ञानेश्वर यांनी अस्वस्थ न होता पर्याय शोधला. ते इंटिग्रेटेड फार्मिंगकडे (integrated farming) वळले. त्यांनी भाज्या आणि फळांची शेती सुरू केली. सोबतच दुधाचा व्यवसायही (Dairy business) सुरू केला.

हेही वाचावाळवंटात आश्चर्यकारकपणे होतेय बर्फवृष्टी! जगाचा अंत होण्याचं चिन्ह तर नाही?

विशेष म्हणजे आता एक मोबाईल ऍपसुद्धा (mobile app) ज्ञानेश्वर यांनी लॉन्च केलं आहे. या माध्यमातून लोक आपली ऑर्डर नोंदवतात. त्यांना होम डिलिव्हरी दिली जाते. सोबतच गावाच्या शेतकऱ्यांसोबत मिळून त्यांनी एक 'अभिनव फार्मिंग क्लब' बनवला आहे. ज्ञानेश्वर सांगतात, की या ग्रुपमधला प्रत्येक शेतकरी दरवर्षी 8 ते 10 लाख रुपये कमावतो.

First published:

Tags: Inspiring story, Mobile app, Pune