Dussehra 2020 : जुंदरी 'विखन' पूजन, म्हणजे नेमकं काय?

Dussehra 2020 : जुंदरी 'विखन' पूजन, म्हणजे नेमकं काय?

खरंतर हा खूपच जुना शब्द आहे. आपल्या आसपास जर साठीतले एखादे आजोबा असतील आणि त्यांनी आपली शेती बैलांच्या सहाय्याने केली असेल तर ते अधिक सविस्तरपणे या शब्दाची उकल करून सांगतील.

  • Share this:

जुन्नर,25 ऑक्टोबर : कृषी संस्कृतीची ओळख असलेला आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा ( Dussehra 2020) आज मोठ्या उत्साहात बळीराजाने (Faramer) साजरा केला. मात्र, वळचणीत असलेली काही लाकडी शेती (Farm) औजारे या निमित्ताने बाहेर निघाली आली त्यांचीही या मुहूर्तावर पूजा केली गेली.

दसरा आणि विखन पूजन एक वेळ नातं होतं. काळाच्या ओघात हा शब्द आणि परंपरा लोप पावली. मात्र, जुन्या लाकडी शेती औजारांच्या जागेवर आधुनिक शेती औजारे आली आणि जुनी ओळख पुसली गेली.  खरंतर हा खूपच जुना शब्द आहे. आपल्या आसपास जर साठीतले एखादे आजोबा असतील आणि त्यांनी आपली शेती बैलांच्या सहाय्याने केली असेल तर ते अधिक सविस्तरपणे या शब्दाची उकल करून सांगतील.

कृषी संस्कृतीत शेती औजारांना जुंदरी भाषेत 'विखन' असं म्हणतात. आज जुन्नर तालुक्यातील येडगाव शिवारात एका शेतकऱ्याच्या घरी ही विखन पूजा संपन्न झाली. हा शब्द ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख असलेल्या शेती आणि मातीचं नात सांगणारा आहे. हजारो वर्षांपासूनचं शेतीशी नातं जोडणाऱ्या बळीराजाने आपल्या शेती औजारांची पूजा करून आज  साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण साजरा केला.

जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील राजेंद्र वाघमारे या शेतकऱ्याच्या शेतावर या सर्व औजारांची पूजा करण्यात आली. यांत्रिक युगात शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर बळीराजा आपल्या शेतात करत असला तरी काही शेतकऱ्यांनी मात्र आपल्या जवळील ठेवणीतील जुन्या काळातील शेती अवजारांची पूजा सुद्धा मोठ्या उत्साहात आज केली.

लाकडी बैलगाडी, धान्य पेरणीची लाकडी पाभार, लाकडी नांगर, लोखंडी नांगर, जमीन सपाट करण्यासाठी वापरला जाणारा लाकडी कुळव, कुदळ, खोरं, फावडे, बैल जुंपण्यासाठी वापरली जाणारी जुकाट, शिवळ, आदी साहित्यामध्ये वापर पाहायला मिळाला. याच बद्दल या शेतकऱ्याने  दिलेली माहितीही मोठी मनोरंजक होती. शेवटी काळ बदलला तरी आपल्या शेती संस्कृती सोबतचं नात नाही बदललं. बदलली आहेत ती फक्त शेती औजारे, तीही आधुनिक पद्धतीची.

Published by: sachin Salve
First published: October 25, 2020, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या