दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरला डमी विद्यार्थी बसल्याचं उघड, पुण्यातील धक्कादायक प्रकार

दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरला डमी विद्यार्थी बसल्याचं उघड, पुण्यातील धक्कादायक प्रकार

  • Share this:

सुमित सोनवणे, (प्रतिनिधी)

दौंड, 21 नोव्हेंबर: दहावीच्या (SSC 10th Exam)मराठी विषयाच्या पेपरला डमी विद्यार्थी (Bogus Student) बसल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund Pune) येथे समोर आला आहे. मूळ परीक्षार्थी आणि डमी विद्यार्थी अशा चार विद्यार्थ्यांविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळाची एसएससीची (SSC)ऑक्टोबर परीक्षा कोरोना संसर्गामुळे 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली.

हेही वाचा..आईनं कष्टानं कमावलेले पैसे मुलानं उडवले दारु आणि इतर व्यसनात, नंतर केला असा बनाव

काल, 20 नोव्हेंबरला दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. मराठीच्या पेपरला दोन डमी विद्यार्थी बसल्याचे उघड झालं आहे. दौंड तालुक्यातील मेरी मेमोरियल हायस्कूल परीक्षा केंद्रावर सुपरवायझरच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थ्यांची तोतयागिरी उघड झाली, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पाटस रस्त्यालगत असलेल्या मेरी मेमोरियल हायस्कूलमध्ये 20 नोव्हेंबर रोजी परीक्षा हॅाल क्रमांक एकमध्ये मयूर प्रकाश कापरे (रा. पिंपळगाव) या परीक्षार्थीच्या जागेवर मयुरी उर्फ पल्लवी प्रकाश कापरे ( वय 19, रा. पिंपळगाव, ता. दौंड) ही परीक्षा देताना आढळून आली. तसेच परीक्षा हॅाल क्रमांक दोनमध्ये परीक्षार्थी गणेश दत्तोबा भोसले (रा. केडगाव, ता. दौंड) याच्या जागी बाळू शिवाजी भोसले (वय-22 , रा.सिद्धटेक, ता. कर्जत , जि. नगर) हा परीक्षा देताना आढळून आला. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच धांदल उडाली. मेरी मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा जोसेफ सोलेमन यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच...

दरम्यान, यंदा कोरोना संसर्गामुळे राज्यातील शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे अशक्य असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होते. 2020 मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या. मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीला उशीर लागून निकाल विलंबाने लागले. त्यात दहावी, बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 चे वर्ग कोरोना महामारी स्थितीमुळे ऑनलाइनच सुरू आहेत. परिणामी या परीक्षा कधी होणार, होणार की नाही याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता आहे.

हेही वाचा..महाराष्ट्रासाठी दिलासादायक आकेडवारी! 'या' बाबतीत राज्य ठरले देशात नंबर वन

शिक्षणमंत्री म्हणाल्या होत्या की, कोरोना विषाणू संसर्गाची सध्याची स्थिती पाहता ही परिस्थिती आणखी काही काळ राहील, असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आदी मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य मंडळाला मे 2021 पू्र्वी दहावी, बारावीच्या परीक्षा घेता येणार नाहीत. आम्ही 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या