पुणे, 08 फेब्रुवारी : पुणे शहरातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने साथीचे आजार वाढले आहेत. सध्या शहरात सर्दी, खोकला, तापीची साथ आणि अपचनाचे विकार दुखण्यामुळे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयात 40 ते 50 रुग्ण दररोज उपचार घेण्यासाठी येत आहेत. या साथीच्या आजारापासून कशी काळजी घ्यावी याचीच माहिती आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
डिसेंबर महिन्यापासून पुण्यामध्ये तापमानामध्ये बदल होत आहे. कधी पुण्याचे तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअस होते तर कधी 20 पर्यंत जात आहे. यामुळे पुण्यामध्ये सध्या विविध प्रकारचे विषाणू हवेमध्ये वेगाने पसरत आहेत. त्यांना पोषक वातावरण यामुळे मिळत आहे. तसेच याला पुण्यातील प्रदूषण देखील कारणीभूत असून यामुळे साथीचे आजार लोकांना जाणवत आहेत.
यामध्ये अनेकदा लोकांना एकदा सर्दी, खोकला झाल्यावरती यातील खोकला हा तब्बल पंधरा दिवस ते महिनाभर लोकांना राहत आहे. तसेच यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे पुन्हा दुसऱ्या विषाणूची लागण लोकांना होऊन पुन्हा आजाराच्या दृष्ट चक्रामध्ये अडकले जात आहेत. तर दुसरीकडे सध्या पुण्यामध्ये सर्वत्रच हवेमध्ये विषाणू आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये हे हवेतले विषाणू धुक्यामुळे जमिनीवरती जास्त करून येतात. आणि त्या धुक्यामुळे देखील भरपूर प्रमाणात नागरिकांना संसर्गजन्य आजार होत आहे, असं अविनाश भोंडवे सांगतात.
काय काळजी घ्यावी
सध्या या धुक्यामुळे सकाळी लवकर आणि रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सर्दी, खोकला,ताप जाणवत आहे. यामुळे जर गरज असेल तरच सकाळी लवकर किंवा रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा किंवा बाहेर पडावे. तसेच थंडीची आपली काळजी घ्यावी. आपले मास्क वापरावे आणि जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्दी खोकला संदर्भाची औषधे घ्यावी वाफ घ्यावी असंही भोंडवे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.