S M L

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी

सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 28, 2018 01:21 PM IST

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी

28 एप्रिल : सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची मोठी गर्दी झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. लोणावळा घाटात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची होणारी गर्दी पाहता खालापूर टोलनाक्यावर अधिकच्या सहा लेन सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच बोरघाटात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे.

आजपासून सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी फिरायला जाण्याचा पर्याय निवडल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. आज चौथा शनिवार, उद्या रविवार, सोमवारी बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे महाराष्ट्र दिन अशा चार दिवस लागून सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुंबई बाहेर जाण्याचा पर्याय निवडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 01:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close