S M L

डीएसकेंना मिळाला दिलासा, पुढची सुनावणी 25 जानेवारीला

बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत आज संपतेय. आज त्यानं जातीनं सुप्रीम कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jan 22, 2018 03:49 PM IST

डीएसकेंना मिळाला दिलासा, पुढची सुनावणी 25 जानेवारीला

22 जानेवारी : डीएसकेंना आता तीन दिवसांचा दिलासा मिळालाय. आता खटल्याची पुढील सुनावणी 25 जानेवारीला आहे. डीएसकेंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी 51 कोटी जमवलेत. पण ते अजूनक्लायंटच्या अकाऊंटला जमा झालेले नाहीत. पैशांच्या व्यवहाराचे पुरावे कोर्टासमोर सादर केलेत. 40 - 40 लाख युएस डॉलरचे दोन व्यवहार करण्यात आलेत. 17 तारखेचा व्यवहार आहे. किती वेळ लागेल सांगता येणार नाही.  पण 72 तासात ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.  बँक ऑफ बडोदाच्या सिंगापूर शाखेतून अकाऊंटला पैसे जमा होतील, असं डीएसकेंच्या वकिलांनी सांगितलं. दरम्यान बँक ऑफ बडोदामध्ये चौकशी करण्याच्या सरकारी वकिलांना सूचना न्यायालयानं दिलीय.

बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत आज संपत होती. आज त्यानं जातीनं सुप्रीम कोर्टात हजर रहावं लागणार होतं. २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत आहोत, पण ही मुदतवाढ अंतिम असेल असं सुप्रीम कोर्टानं गेल्या सुनावणीत बजावलं होतं. लोकांना त्यांचे पैसे परत हवे आहेत, म्हणून त्यांना तुम्ही तुरुंगात जाऊ नये असं वाटतंय, त्यामुळे लवकरात लवकर पैसे परत करा, असंही कोर्टानं म्हटलं होतं.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ?

लोकांना त्यांचे पैसे परत हवे आहेत म्हणून त्यांना तुमची अटक नको आहे. तुम्हाला कारागृहात पाठवून त्यांना पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला व्यवसायात झालेल्या नुकसानीशी गुंतवणूकदारांचे काहीही घेणे-देणे नाही. पुढच्या सुनावणीला तपास अधिकाऱ्यांनीही हजर रहावं. गुंतवणूकदारांचे किती पैसे द्यायचे आहे, याची माहितीही सादर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2018 09:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close