पुणे, 16 ऑगस्ट : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि 2000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांना अखेर कारागृहाबाहेर येण्यास मुभा मिळाली आहे. तब्बल 30 महिन्यांनंतर डिएसके कारागृहातून बाहेर येणार आहे.
डी.एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना कोविड-19 चा संसर्ग झाला होता. तब्येत ढासळल्याने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.
मोठी बातमी, अजितदादा, पार्थ आणि काकांसोबत झाली बारामतीत बैठक
कोरोनाच्या प्रतिबंधामुळे अंत्यसंस्कारासाठी कारागृहात असणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांतील कुणालाही अश्विनी देशपांडेंच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता DSK यांच्या वकिलाने किमान 13 व्याच्या विधीसाठी सूट मिळावी म्हणून कोर्टात अर्ज केला होता.
पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या तेराव्यासाठी डी.एस.कुलकर्णी यांनी कोर्टात यासाठी परवानगी मागितली होती. अखेर कोर्टाने त्यांना तेराव्यासाठी काही तास घरी जाण्याची परवानगी दिली.
नागपूर हादरलं, काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या
त्यामुळे आज मुलींच्या मरणोत्तर क्रियाविधी करण्यासाठी डीएसकेंना दुपारी तीन वाजेपर्यंत कारागृह बाहेर राहण्यास मुभा दिली आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा शिरीष सुद्धा असणार आहे. दुपारी 3 नंतर त्यांची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी होणार आहे.