दारूच्या नशेत तर्रर्र कॉन्स्टेबलने TV स्टारला पाहून केले अश्लील हावभाव

दारूच्या नशेत तर्रर्र कॉन्स्टेबलने TV स्टारला पाहून केले अश्लील हावभाव

बावधन येथील टिपसी टर्टल या रेस्टॉबारमध्ये दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलने काही TV स्टार्सकडे पाहून अश्लील हावभाव केल्याची धक्कादायक समोर आली आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे,(प्रतिनिधी)

पुणे,15 ऑक्टोबर: बावधन येथील टिपसी टर्टल या रेस्टॉबारमध्ये दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलने काही TV स्टार्सकडे पाहून अश्लील हावभाव केल्याची धक्कादायक समोर आली आहे. गैरवर्तन करणाऱ्या कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. नितीन कदम असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो हवेली उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नियुक्तीला होता. ही घटना बावधन येथील टिपसी टर्टल या रेस्टॉबारमध्ये रविवारी घडली.

कॉन्स्टेबल नितीन कदम याने तिथे असणाऱ्या टीव्ही स्टार व काही महिलांबरोबर गैरवर्तन केले. त्याने महिलांवर अश्लील हावभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांनी नितीन कदमला निलंबित केले आहे.

दोन व्हिडिओ व्हायरल...

या घटनेचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये कदम महिलांना तो पोलीस असल्याचे सांगताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो नाचतान महिलांना पैसे दाखवताना, अश्लील हावभाव करताना दिसत आहे. TV स्टार्सच्या टेबलवरील डिशेस पाडल्या. त्याचे बिल आपण देतो, असे सांगितले. त्यानंतर महिलांना शिवीगाळ करताना दिसत आहे. एका TV स्टारला अॅटम म्हणून संबोधले.

या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासून आरोपी पोलीस कॉन्स्टेबल नितीन कदम याला तडकाफडकी निलंबित केले आहे.

विठुरायाच्या बाजूला उभ्या असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या