Home /News /pune /

Pune: दारू पिऊन तर्राट होताच मित्रांमध्ये रंगला खुनी खेळ, सपासप वार करत जीवलगाची हत्या

Pune: दारू पिऊन तर्राट होताच मित्रांमध्ये रंगला खुनी खेळ, सपासप वार करत जीवलगाची हत्या

Murder in Pune: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रक याठिकाणी एका तरुणाची निर्घृण हत्या (Young man brutal murder by friends) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 16 डिसेंबर: पुणे (Pune) जिल्ह्याच्या खेड (Khed) तालुक्यातील खरपुडी बुद्रक याठिकाणी एका तरुणाची निर्घृण हत्या (Young man brutal murder by friends) केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील काही तरुणांनी दारूच्या नशेत आपल्या मित्रांना मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. जखमी तरुणाला बोलताही येत नाहीये, त्याच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (FIR lodged) आला असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. रामदास सोपान थिटे असं हत्या झालेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव असून तो खेड तालुक्यातील रेटवडी येथील रहिवासी आहे. तर दत्तात्रय रामदास टाकळकर असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. बुधवारी रात्री मृत रामदास आणि दत्तात्रय आपल्या काही मित्रांसोबत कनेरसर ते खेड मार्गावरील खरपुडी बुद्रुक येथे हॉटेल माथेरान गारवा येथे गेले होते. याठिकाणी दारू प्यायल्यानंतर किरकोळ कारणातून मित्रांमध्ये वाद झाला. हेही वाचा-मुंबई: हॉटेलात डांबून शरीराचे रोज व्हायचे सौदे, तरुणीची व्यथा ऐकून पोलीसही सुन्न या वादानंतर हॉटेलबाहेर आलेल्या मित्रांनी रामदास आणि दत्तात्रय यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी तरुणाने रामदास याच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भयावह होता, रामदास आणि दत्तात्रय दोघंही रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत कोसळले. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी रामदासचा चुलत भाऊ अतुल थिटे याला फोन करून या घटनेची माहिती दिली. अतुल आपल्या काही नातेवाईकांना याठिकाणी घेऊन आला असता, रामदास आणि दत्तात्रय रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते. हेही वाचा-मित्र पत्नीवर करायचे रेप अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार त्यांच्या बाजूलाच त्यांची गाडी आणि फुटलेल्या काचा आढळल्या. यानंतर अतुल याने पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमी तरुणांना चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी रामदास याला मृत घोषित केलं आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रयवर याठिकाणी उपचार सुरू आहेत. मृत रामदासचा चुलत अतुल थिटे याच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune

    पुढील बातम्या