वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 11 जुलै : पाकिस्तानी तरुणी झारादास गुप्ताच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याने दोन इतर महिलांना डीआरडीओच्या कार्यालयात बोलवून अत्याचार केली असल्याची धक्कादायक माहिती एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे. डीआरडीओचा संचालक असलेल्या कुरूलकरची एक एक कृष्णकृत्यं समोर येत आहेत. झारा दास गुप्ता हिच्या हनीट्रॅपमध्ये अडकून बेबी बेबी म्हणत कुरूलकर याने अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला दिली होती. आता केवळ एवढच नाही तर डीआरडीओशी संबंधित कंत्राट देण्यासाठी दोन महिलांवर अत्याचार केल्याची ही धक्कादायक बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे. अग्नी-6, मिसाइल लॉन्चर ते ब्रम्होस, कुरूलकर-झाराच्या व्हॉट्सऍप चॅटने खळबळ! दोन्ही पीडित महिलांना डीआरडीओच्या कामाचे टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा ही तपास होण आवश्यक आहे. पीडित महिला या भारतीय महिला असून या महिलांना मध्ये वेगवेगळे टेंडर देतो म्हणून कुरुलकर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून कार्यालयातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आरोपपत्रात नमूद आहे. कुरूलकर प्रकरणात एटीएसने दीड हजार पानांच आरोपपत्र आठ दिवसांपूर्वीच दाखल केलं आहे, आता या आरोपपत्रातून एकएक धक्कादायक खुलासे होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







