Elec-widget

पुण्यातील या मानाच्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी केला लंपास

पुण्यातील या मानाच्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी केला लंपास

आश्चर्याची बाब म्हणजे भाऊसाहेब रंगारी गणपतीचे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.

  • Share this:

पुणे,28 नोव्हेंबर: पुण्यातला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 26 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजून 31 मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दानपेटी चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे भाऊसाहेब रंगारी गणपतीचे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या वतीने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असल्याची माहिती ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड. मिलिंद पवार यांनी दिली.

मिळालेली माहिती अशी की, गणपती मंदिरातील दानपेटी स्टीलची होती. ती दोन फूट आकाराची होती. अनेक वर्षांपासून ती मंदिरात होती. दानपेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. या प्रकरणी ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठ येथील गणपती भवन आणि गणपती मंदिरात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. गणपती मंदिरात भाऊसाहेब रंगारी यांनी स्वतः तयार केलेला लाकडी रथ आणि गणपतीची मूर्ती त्या ऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे 129 वर्षांपासून विराजमान आहे. तिच मूर्ती गणेशोत्सवात 10 दिवसांकरिता प्रतिष्ठापना करून बसवली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com