मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भटक्या कुत्र्याला 2 तरुणांनी हातोडा आणि लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण, पुण्यातला VIDEO

भटक्या कुत्र्याला 2 तरुणांनी हातोडा आणि लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण, पुण्यातला VIDEO

मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोंढव्यातील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोंढव्यातील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोंढव्यातील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे, 01 मार्च :  सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात (PUNE) दोन तरुणांनी भटक्या कुत्र्याला (Dog) लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोंढव्यातील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाना पेठेतून काही मुले या जखमी कुत्र्याला घेऊन रुग्णालयात गेले होते. कुत्र्याच्या मानेवर, पाठीवर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी कुत्र्यावर प्रथमोपचार करून मुलांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी नाना पेठेतील हलवाई चौकात हा कुत्रा गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याचे सांगितले.

परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 25 फेब्रुवारीला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील दोन तरुणांनी कुत्र्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्राणी प्रेमीतून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सुद्धा पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपलेगुरव भागात राहणाऱ्या विनोद मुरार नामक व्यक्तीचा पाळीव कुत्रा बाहेर फिरून घरात आला. तेव्हा त्याच्या तोंडाला फेस आला आणि मृत्यू झाला. हे अचानक कसं घडलं हे बघण्यासाठी मुरार यांनी बाहेर शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना एक कुत्रा पोत्यात टाकून जाळल्याचे आढळून आले. तर एका कुत्र्याचा जखमी अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसले. त्याच बरोबर दोन कावळेही मृत अवस्थेत आढळून आले होते.

First published:

Tags: Pune