• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुणे: नोटीस पाठवल्याचा घेतला विचित्र बदला; महिलेनं सोसायटीच्या अध्यक्षाचं केलं जगणं मुश्कील

पुणे: नोटीस पाठवल्याचा घेतला विचित्र बदला; महिलेनं सोसायटीच्या अध्यक्षाचं केलं जगणं मुश्कील

Crime in Pune: चुकीच्या कामाबद्दल सोसायटीच्या अध्यक्षाने एका डॉक्टर महिलेला दोन ते तीन नोटीसा पाठवल्याच्या (society chairman sent notice to doctor woman) रागातून संबंधित महिलेनं विचित्र बदला घेतला आहे.

 • Share this:
  पुणे, 25 ऑक्टोबर: चुकीच्या कामाबद्दल सोसायटीच्या अध्यक्षाने एका डॉक्टर महिलेला दोन ते तीन नोटीसा पाठवल्याच्या (society chairman sent notice to doctor woman) रागातून संबंधित महिलेनं विचित्र बदला घेतला आहे. आरोपी महिलेच्या कृत्यामुळे संबंधित सोसायटीच्या अध्यक्षाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. याप्रकरणी पीडित सोसायटीच्या अध्यक्षाने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. महिलाचा कांड पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी महिला डॉक्टरविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 37 वर्षीय आरोपी महिला ही मनोविकारतज्ज्ञ असून फिर्यादी ज्या सोसायटीत राहतात, तिथेच त्या वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी फिर्यादी सोसायटीच्या चेअरमनने आरोपी महिलेला चुकीच्या कामाबद्दल दोन ते तीन नोटीसा पाठवल्या होत्या. यामुळे संबंधित महिलेला याचा प्रचंड राग आला होता. याच रागातून आरोपी महिला डॉक्टरने विचित्र बदला घेतला आहे. हेही वाचा-पत्नीच्या औषधांची रक्कम भरण्याचा निरोप येताच पतीनं उचललं टोकाचं पाऊल आरोपी महिलेनं सोसायटीच्या अध्यक्षांच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट (Fake instagram account) काढलं होतं. यानंतर आरोपी महिलेनं सोसायटीतील अन्य एका महिलेला 'तुम्ही मला प्रायव्हेटमध्ये भेटा, तुमच्याकडे एक काम आहे' असा आक्षेपार्ह मेसेज (Offensive message) केला. सोसायटीच्या चेअरमनने अशाप्रकारचा मेसेज केला म्हणून संबंधित महिला सोसायटीच्या चेअरमनवर भडकली आणि तिने सर्वांसमोर फिर्यादीला जाब विचारला. पण त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा मेसेज पाठवला नसल्याचं सांगितलं. तसेच संबंधित अकाउंट आपलं नसल्याचंही सांगितलं. हेही वाचा-बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था हा प्रकार लक्षात आल्यानंतर, चेअरमनने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, संबंधित प्रकार सोसायटीत राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेनं केल्याचं उघड झालं आहे. आरोपी महिलेनं फिर्यादीचं इन्स्टाग्रामवर अकाउंट काढून जाणीवपूर्वक पद्धतीने बदनाम करण्याच्या हेतूने असे आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: