पिंपरी,10 सप्टेंबर : पिंपरीमध्ये एका स्त्रीरोगतज्ज्ञाला कोयत्यानं मारहाण झालीय. का तर त्यांनी 5 महिन्याचा गर्भपात करण्याला नकार दिला म्हणून. सुदैवानं डॉक्टर अमोल बिडकर यांना गंभीर इजा झालेली नाही आणि ते सुखरुप आहे.
एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारं दाम्पत्य डॉक्टरांकडे आलं, आणि महिलेचा गर्भपात करा म्हणून मागणी करू लागले. अर्थातच, कायद्यानुसार 5 महिन्यांचा गर्भपात करता येत नाही. डॉक्टरांनी हे स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर पाच दिवसापूर्वी पुन्हा तरुणाने फोन करून गर्भपात करण्यासाठी डॉक्टरला धमकी दिली, त्यावेळीही डॉक्टरने गर्भपात करता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या तरूणाने शनिवारी रात्री पाच ते सहा जणांसह रूग्णालयात येऊन आपल्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप बिडकर यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.