• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुणेकरांनो, कोरोनावर उपचार घ्यायचा? हॉस्पिटलचा धक्कादायक प्रकार उघड

पुणेकरांनो, कोरोनावर उपचार घ्यायचा? हॉस्पिटलचा धक्कादायक प्रकार उघड

कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून...

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 07 ऑगस्ट : कोरोनाबाधितांवर उपचार करताना अवास्तव  बाबींचे  बिल आकारणी  केल्या प्रकरणी आणि कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून घेतल्याचा ठपका ठेवत  पिंपरी चिंचवड शहरातील नामांकीत खासगी रूग्णालयांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बिलांची तपासणी करणाऱ्या समितीचे प्रमुख तथा आयकर विभागाचे सह आयुक्त एन.अशोक बाबू यांनी  पिंपरी चिंचवड शहरातील नामांकीत खासगी रूग्णालयांना नोटीसी बजवल्या आहेत. चिंचवड येथील बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना नोटिसा बजावण्यात आलेयांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, या तपासणी पथकाने घेतलेल्या आक्षेपांबाबत या रुग्णालयांना आठ दिवसांत खुलासा सादर करायचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. तर  नियमांचे उल्लंघन केल्याने रुग्णालय प्रशासनाविरुद्ध दंडात्मक कारवाई का, करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. या समितीने शहरातील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली. पाहणी केली. त्यात रुग्ण दाखल करण्यासाठीचे शुल्क, एक्सरे शुल्क, औषध खर्च करण्यासाठीची आकारणी केली जाते. ही आकारणी राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पीपीई किट वगळता 4 हजार, 7500 आणि 9 हजार रुपये अशा तीन दराप्रमाणे कोणत्या प्रकारचा उपचार दिला जातो. त्यानुसार, बिल आकारणी करणे अपेक्षित आहे. पण, या विहित दराव्यतिरिक्त अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याचे समोर आले. ही बिल आकारणी योग्य नाही. त्यामुळे रुग्णालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये? अशी विचारणा केली आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या सर्व रुग्णाच्या बिल देयकांची फेरमोजणी करून त्यांना अनुज्ञेय असणारा परतावा देण्याबाबत सांगण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवी ह्यांनी  दिली आहे.
Published by:sachin Salve
First published: