पुणे, 26 सप्टेंबर : जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे उपाय म्हणून लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या काळात सर्वजण घरात अडकले गेले. त्यामुळे काहींसाठी हा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी महत्त्वाचा काळ ठरला. तर काही जणांसाठी हा लॉकडाउन दुरावणारा ठरला आहे. कारण, लॉकडाउनच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण हे दुप्पटीने वाढले असल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या काळात घटस्फोटांच्या दाव्याचे प्रमाण दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 6 महिन्यात लॉकडाउनमुळे बऱ्याच जोडप्यांना घरीच अडकून पडावं लागल्याने विसंवाद, बेबनाव वाढला गेला. त्यामुळे कायदेशीर काडीमोड घेण्यासाठी गेल्या 6 महिन्यात वकिलांकडे घटस्फोटाची चौकशी वाढली आहे.
ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सुटी सिगारेट व बिडी विक्रीला राज्यात बंदी!
यात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे बऱ्याच केसेसची सुनावणीही ऑनलाइन सु्द्धा झाली आहे.
जर घटस्फोटाची तक्रार दाखल झाली तर आधी संबंधित दाव्यातील पती पत्नींना एकत्र आणण्याचा प्रयत्न वकिलांकडून केला जातो. मात्र, शक्य नसेल तर परस्पर संमतीने वेगळं होण्याचा सल्ला दिला जात असतो.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयातील घटस्फोटांच्या केसेसच्या आकडेवारीवर समोर आली आहे. जर गेल्या अडीच वर्षातील म्हणजे जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2020 या काळातील स्थिती बघितली तर, एकतर्फी घटस्फोट, नांदायला येणे, विवाह रद्दबातलचे अर्ज आले आहेत. 4273 यापैकी 3384 दावे निकाली निघाले आहे.
मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाचं छिंद्रं बुजवतंय, रोहित पवारांचा थेट निशाणा
परस्पर संमतीने घटस्फोटाचे दावे हे 3152 आले होते. यापैकी 1910 दावे हे निकाली निघाले आहे. तर मुलांचा ताबा मिळण्याबाबत 99 दावे करण्यात आले होते. त्यापैकी 35 दावे हे निकाली निघाले आहेत.
मनाई, ताकीद आणि ठराव करण्याबाबत 89 दावे आले होते. त्यापैकी 39 दावे हे निकाली काढण्यात आले आहे.
सुशांत प्रकरणात ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एंट्री
दिवाणी व कायमची पोटगी, स्थावर व जंगम मालमत्ता वाटप संबंधी 47 दावे आले होते. त्यापैकी 21 दावे हे निकाली निघाले आहेत. तर इतर कारणांमुळे 1978 दावे करण्यात आले होते त्यापैकी 1827 दावे हे निकाली काढण्यात आले आहे.
या संपूर्ण काळात एकूण 9638 दावे करण्यात आले होते. त्यापैकी 7316 दावे हे निकाली काढण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.