Home /News /pune /

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आखला नवा प्लॅन

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आखला नवा प्लॅन

अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

परदेशी नागरिकांमुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली.

    पुणे, 12 मे : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण () आढळले होते. त्याला कारण होतं, परदेशातून पुण्यात आलेले नागरिक. या परदेशी नागरिकांमुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आणि हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नीटपणे वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती की नव्हती, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता पुन्हा ही चूक होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्यातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसंच, बाहेरून पुण्यात येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. प्रवास करून येणाऱ्या अशा लोकांमुळे कोरोना संसर्गामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागात इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे. असा आहे प्लॅन पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सर्व उपविभागी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांनी तालुक्याच्या आणि गावाच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करून सर्व विभागाच्या संयुक्त पथकामार्फत बाहेरून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. यावेळी संबंधितांना कोणतीही लक्षणं आढळली नाहीत तर होम क्वारन्टाइनचा शिक्का मारावा आणि लक्षणं आढळल्यास कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती? ताज्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात एकूण 3008 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 161 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 139 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 1 हजार 630 इतकी आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. संकलन, संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या