Home /News /pune /

धक्कादायक! पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार

धक्कादायक! पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार

Crime in Pune: गेल्या काही महिन्यांत पुण्यात बिर्याणीवरून वाद (Dispute over Biryani) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता पुण्यातील हडपसर परिसरात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 14 जानेवारी: गेल्या काही महिन्यांत पुण्यात बिर्याणीवरून वाद (Dispute over Biryani) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता पुण्यातील हडपसर परिसरात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तीन जणांनी केटरिंग व्यावसायिकाला बेदम मारहाण (3 men beat catering businessman) केली आहे. आरोपींनी लोखंडी सळईने त्यांच्यावर वार (Attack with iron rod) केले आहेत. संबंधित प्रकार गुरुवारी रात्री हडपसर परिसरातील बोराटे नगर याठिकाणी घडला आहे. प्रकारानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत. शुभम हनुमंत लोंढे (वय 23), ऋषिकेश समाधान कोलगे (वय 23) आणि विनायक परशुराम मुरगंडी (वय 21) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मैनुद्दीन जलील खान असं 42 वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैनुद्दीन खान याचं हडपसर परिसरातील बोराटे नगर याठिकाणी केटरिंगचा व्यवसाय आहे. येथून फिर्यादी खान बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थाचे पार्सल देतात. हेही वाचा-कानाचा चावा घेत पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्याला हादरवणारी घटना दरम्यान, घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास संबंधित तिन्ही आरोपींनी फिर्यादी खान यांच्याकडून बिर्याणी पार्सल घेतली होती. बिर्याणी घेतल्यानंतर तिन्ही आरोपी निघून जात होते. यावेळी खान यांनी आरोपींना अडवलं आणि बिर्याणीचे पैसे देण्याची विनंती केली. पण आरोपींनी बिर्याणीचे पैसे देण्याऐवजी खान यांनी शिवीगाळ आणि दमदाटी करायला सुरुवात केली. त्यामुळे हा वाद वाढत गेला. हेही वाचा-पुण्यातील बड्या बिल्डरला अजितदादांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितले 20 लाख यानंतर संतापलेल्या तिन्ही आरोपींनी टीका भाजण्याच्या सळईने केटरिंग व्यावसायिकाला मारहाण केली. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत ही भांडणं मिटवली. या धक्कादायक प्रकारानंतर खान यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत, तिन्ही आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस संबंधित तिघांची कसून चौकशी करत असून जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. बिर्याणीचे पैसे देण्यावरून झालेल्या या नव्या वादामुळे पुण्यातील जुना 'बिर्याणी वाद' पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या