मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणेकरांचा मनपावर संताप; क्रीडांगणावरील 2 कोटींच्या रामाच्या शिल्पामुळे नवा वाद

पुणेकरांचा मनपावर संताप; क्रीडांगणावरील 2 कोटींच्या रामाच्या शिल्पामुळे नवा वाद

 पुण्यातही या एक सदस्यीय वार्ड पद्धतीने होणार असल्याने सगळी गणितंच बदलून गेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेनं स्वागत केलंय.

पुण्यातही या एक सदस्यीय वार्ड पद्धतीने होणार असल्याने सगळी गणितंच बदलून गेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेनं स्वागत केलंय.

प्रभू रामाच्या शिल्पा ऐवजी क्रीडांगणावर सिंथेटिक ट्रॅक जास्त योग्य ठरणार नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे, 4 ऑगस्ट : पुणे महापालिकेच्या (Pune) स्थायी समितीत दोन कोटी रुपयांची रामाची मूर्ती क्रीडांगणात लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. धनकवडीच्या आंबेगाव पठार भागातील भाजप नगरसेविका वर्षा तापकीर यांनी हा ठराव दिला आहे. स्थायी समितीने तातडीने हा ठराव मान्य केला आहे. मात्र रामाच्या मूर्तीच शिल्प क्रीडांगणावर बसवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरक्षित क्रीडांगणावर खेळासाठीच्या सुविधा देणं अपेक्षित असताना देवाची शिल्प मंदिरात ठेवण्याऐवजी बाहेर क्रीडांगणावर लावणं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकतं. सर्वाधिक महत्वाचं म्हणजे कोविडच्या काळात लोकप्रतिनिधींनी आरोग्य व्यवस्थेतील गुंतवणूक सोडून धार्मिक अस्मितेच्या प्रतिकांना महत्व देणं धोरणात्मक दृष्ट्या किती योग्य असा प्रश्न सजग नागरिक मंचाकडून विचारला जात आहे. मात्र हा अस्मितेचा विषय असून आरोग्यासाठी गरज लागेल तिथे खर्च करू अस स्पष्टीकरण वर्षा तापकीर यांनी दिलं आहे. मात्र या ठरवातील भाषा अत्यंत आक्षेपार्ह असून त्यात धर्माशी संबंधित संघटनांनी या पुतळ्याची मागणी केल्याचं म्हटलंय. ही भाषा घटनाबाह्य असल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केला आहे.

हे ही वाचा-पुण्याच्या वेदिकाचा हृदय पिळवटून टाकणारा 'तो' Video ठरला शेवटचा

या दोन कोटीच्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या उभारणी पूर्वी काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत, ते असे...

-महापालिकेच्या धोरणानुसार क्रीडांगणावर असे पुतळे उभे करायला परवानगी नाही

-देवांचे पुतळे क्रीडांगणावर उभे करून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ?

-प्रभू रामाच्या शिल्पा ऐवजी क्रीडांगणावर सिंथेटिक ट्रॅक जास्त योग्य ठरणार नाही का ?

-आरक्षणाने ताब्यात आलेली क्रीडांगणे देवांच्या मुर्त्या उभ्या करण्यासाठी आहेत का ?

-एकीकडे शहरी गरीब योजना निधी अभावी बंद करण्याचा घाट घातला जातोय ..

-शहराला अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका सांगण्यात आलाय आणि महापालिका पुतळ्यावर उधळपट्टी का करतेय ..

-असे पुतळे उभे करण्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाची परवानगी आवश्यक असते ती मिळाली आहे का ?

First published:

Tags: Pune