मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पिंपरी चिंचवड पालिकेकडून 900 मृतांच्या आकड्यात तफावत, भाजप नगरसेविकेचा आरोप

पिंपरी चिंचवड पालिकेकडून 900 मृतांच्या आकड्यात तफावत, भाजप नगरसेविकेचा आरोप


आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकूण 3 हजार 692 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात...

आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकूण 3 हजार 692 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात...

आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकूण 3 हजार 692 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात...

पिंपरी चिंचवड, 25 एप्रिल : पुण्यात (Pune Corona) कोरोनाने थैमान घातले आहे. उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येही (pimpri chinchwad municipal corporation) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, कोरोनाबाधित मृतकांचे आकडे प्रसिद्ध करताना महापालिका प्रशासनाने हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर आरोप भाजपच्या (BJP) नगरसेविकेनं केला आहे.

1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान झालेल्या मृत्यूबाबत महापालिकेनं प्रसिद्ध केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतकांवर केल्या गेलेल्या अंत्यसंस्काराच्या आकडेवारीत सुमारे 900 आकड्यांची तफावत असून या मृत्यूची माहिती प्रशासनाने लपविल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाने त्या बाबत खुलासा करण्याची मागणी  सत्ताधारी पक्षातल्याच ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

प्रेमविवाह केल्यानंतर पतीला लागलं भलतंच व्यसन; विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय विभागा मार्फत दिल्या जाणाऱ्या मृतकांची आकडेवारी संशयास्पद वाटल्याने सावळे यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमीत जाऊन तेथील रजिस्टर तपासले आणि धक्कादायक बाब उघडकीस आली.

आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एकूण 3 हजार 692 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात 1 ते 23 तारखेदरम्यान झालेल्या कोरोना बधितांच्या मृतदेहावर महापालिकेच्या वतीने  भाटनगर स्मशानभूमीत 743, भोसरी स्मशानभूमीत 601, निगडी स्मशान 358 आणि सांगवी 118 असे एकूण 1820 अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

तुम्हीही लहान मुलांना मारता किंवा ओरडता का? मुलांवर असा होऊ शकतो परिणाम

मात्र हीच बाब प्रसिद्ध करण्यासाठी जेव्हा प्रशासना तर्फे  लेखी आकडेवारी देण्यात आली तेव्हा या दरम्यान 841कोरोनाबधितांचाच मृत्यू  झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. आणि त्यामुळे दोन्ही आकडेवारीत तब्बलं 900 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद नसल्याची तफावत दिसून आल्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मात्र, असं असून देखील या संपूर्ण प्रकाराविषयी काहीही माहीत नसल्याचे सांगत योग्य ती माहिती घेऊन खुलासा करणार असल्याचे  प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. तर नगरसेविका सावळे यांनी मात्र या प्रकरणी चौकशीची करण्याची मागणी केली आहे.

First published: