मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'दूधाचा धंदा केला, गायी विकून एक एकर शेती घ्यायचो' अजितदादांनी सांगितलं खास सिक्रेट

'दूधाचा धंदा केला, गायी विकून एक एकर शेती घ्यायचो' अजितदादांनी सांगितलं खास सिक्रेट

त्यावेळी मी एक गाय साडेसात हजारांना विकायचो आणि त्यावेळी एक एकर जमीन

त्यावेळी मी एक गाय साडेसात हजारांना विकायचो आणि त्यावेळी एक एकर जमीन

माझे वडील वारल्यानंतर माझं बस्तान बसले ते डेअरीमुळे बसलं. मी देखील दुधाचा धंदा करायचो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 18 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अवघ्घा महाराष्ट्र दादा म्हणून ओळखतो. पण ही ओळख मिळवण्याआधी अजितदादा हे एक दुधवाले होते, असं कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण, खुद्द अजितदादांनी आपण दुध डेअरी धंद्यातून पुढे आल्यांचं गुपित उघडं केलं आहे.

आज बारामतीमध्ये एका खाजगी डेअरीचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी अजितदादांनी दूध व्यवसायाशी आपला संबंध कसा होता याचा खुलासा केला.

(भाजपकडून ठाकरेंचा 'तो' फोटो ट्विट! अंधारे म्हणल्या, फडणवीसांसोबत मुख्यमंत्र्यांची चौकशी करा)

माझे वडील वारल्यानंतर माझं बस्तान बसले ते डेअरीमुळे बसलं. मी देखील दुधाचा धंदा करायचो. मी पण दुधाच्या धंद्यातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे' असा खुलासाच अजित पवारांनी केला.

( 'फक्त 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख..' बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक)

तुम्हाला पटणार नाही असं सांगतो, त्यावेळी मी एक गाय साडेसात हजारांना विकायचो आणि त्यावेळी एक एकर जमीन साडेसात हजारांना घ्यायचो. त्यावेळी जमिनीचे दर कमी होते आणि गायींबद्दल प्रचंड कुतुहल होतं' असं अजित पवार म्हणाले.

'आमच्या बारामतीमध्ये अनेक जण दुध डेअरीचा व्यवसाय करायचे. यातून कष्ट घेतलं तर यश येतं. गायी सुद्धा प्रचंड वाढल्या आहेत. सर्वांनी बारकाईने अभ्यास करून दूध व्यवसाय करत आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.

First published: