Home /News /pune /

पोरीच्या जिद्दीपुढे परिस्थितीनंही टेकले हात; घरकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलगी बनली CA

पोरीच्या जिद्दीपुढे परिस्थितीनंही टेकले हात; घरकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलगी बनली CA

फोटो-सकाळ

फोटो-सकाळ

पुण्यातील अरण्येश्वर परिसरातील गवळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलीनं सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात तरुणीनं ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

    पुणे, 21 फेब्रुवारी: पुण्यातील अरण्येश्वर परिसरातील गवळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलीनं सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात तरुणीनं ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. धनश्री संजय हिरणवाळे असं संबंधित तरुणीचं नाव आहे. तिची आई परिसरातील सोसायटीमध्ये घरकाम करते. तर वडीलही एका छोट्या कंपनीत तुटपुंज्या पगारावर नोकरी करतात. असं असूनही परिस्थितीपुढे हार न मानता धनश्रीने पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केल्यानं सर्व स्तरातून धनश्रीचं कौतुक केलं जात आहे. खरंतर, दहावीची परीक्षा पास झाल्यानंतरच धनश्रीनं सीए होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे महागडे क्लास लावणं परवडणारं नव्हतं. शिवाय मार्गदर्शन करायलाही कोणीही नव्हतं. सोबतीला होती फक्त जिद्द आणि चिकाटी. पोरीच्या या जिद्दीपुढे तिच्या परिस्थितीने देखील हात टेकले आहे. तिने केवळ इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर सीए परीक्षेच्या सर्व पातळ्या उत्तीर्ण केल्या आहेत. हेही वाचा-पालकांनो, ऑफलाईन शाळांमध्ये तुमच्या मुलांना 'हे' प्रॉब्लेम्स येत नाही ना? वाचा आपल्या यशाबद्दल बोलताना धनश्रीनं सांगितलं की 'सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. महागडे खाजगी क्लास लावणं आणि तेथे जाऊन अभ्यास करणं परवडणारं नव्हतं. तसेच मार्गदर्शन करणारंही कोणी नव्हतं. शिवाय सीए होणं सोपं नसतं. ते तुला झेपणार नाही. त्याऐवजी तू बँकींगच्या परीक्षेची तयारी कर, असे सल्ले देऊन मनाचं खच्चीकरण करणारे देखील भरपूर होते. पण कॉमर्स शाखेत प्रवेश घेतलाय म्हटल्यावर सीए व्हायचंच हा निश्चय मनाशी पक्का केला होता.' हेही वाचा-अवघ्या 42 सेकंदात Youtuber ने केली 1 कोटी 75 लाख रुपयांची कमाई; कसं झालं शक्य? सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, धनश्रीचं पुण्यातील अरण्येश्वर परिसरात दोन खोल्यांचं घर आहे. या घरात ती आपले आई वडील, काका-काकू, सख्ख्या-चुलत भावंडांसोबत राहते. तिची आजी याच परिसरातील सोसायटीमध्ये 1980 पासून घरकाम करत होती. त्यानंतर पुढे धनश्रीच्या आईने आणि काकूने देखील हेच काम करायला सुरुवात केली. तिचे काका रिक्षाचालक आहेत. अशी एकंदरीत बेताची परिस्थिती असताना देखील धनश्रीने हार मानली नाही. पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण करून मोठं यश मिळवलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Career, Pune

    पुढील बातम्या