धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर अपघात

धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर अपघात

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील एका गाडीला रविवारी सकाळी पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर अपघात झाला.

  • Share this:

लोणावळा, 8 सप्टेंबर: विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील एका गाडीला रविवारी सकाळी पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर अपघात झाला. सुदैवाने धनंजय मुंडे अपघातग्रस्त गाडीत नव्हते. मुंडे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातग्रस्त गाडीत दोन चालक आणि एक अंगरक्षक होता. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, धनंजय मुंडे सध्या मुंबईला पोहोचले असून ते सुखरूप आहेत. धनंजय मुंडे मुंबईला जात असताना सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला मळवली जवळीस औढे पुलाजवळ अपघात झाला. चाक निखळल्याने भरधाव गाडी दोन गाड्यांना धडकून रस्त्याच्या कडेली पलटी झाली. अपघातग्रस्त गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमी चालक आणि अंगरक्षकावर पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. व्यंकट गित्ते (चालक), संतोष जाधव (चालक) आणि सोपान चाटे(अंगरक्षक) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, मी सुखरुप आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी ही विनंती खुद्द धनंजय मुंडे यांनी आप्तजनांनी केली आहे.

धनंजय मुंडेंनी बाप्पाला घातलं हे साकडं...

महाराष्ट्रात सध्या राजकीय सत्ताधाऱ्याकडून राजकीय भ्रष्टचार सुरू केला आहे तो थांबवा? तसेच बाप्पांनी सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी. निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे, शेतकरी संकटात आहेत, सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील संकटे, विघ्नहर्त्याने दूर करावे, अशी विनम्र प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे केली आहे. तसेच सरकारला सदबुद्धी देवो असं साकडं घालत देशात प्रचंड आर्थिक मंदी आहे. या सरकारमधील मंत्र्यांना ही आर्थिक मंदी दूर करता येणार नाही, त्यामुळे बाप्पांनी आर्थिक मंदी दूर करावे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.

देशभरात श्रीगणेशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी देखील परळी येथील त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना केली. धनंजय मुंडेंनी मुलगी आदिश्रीसह सपत्नीक बाप्पाची आरती केली. या प्रसंगी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. संपूर्ण भारतभर बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रत्येकजण बाप्पाकडे काहींना काही मागत असतो. धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे प्रार्थना केली की, सध्या महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू आहे. मागील 70 वर्षांत कधी नव्हे ते मानवनिर्मित व सरकारनिर्मित महाभयानक आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सरकारला हे संकट दूर करता येईल, असे वाटत नाही? तर विघ्नहर्ता हे संकट दूर करेल, अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी केली आहे.

VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या