देवेंद्र फडणवीस यांनी कुलदैवताच्या दर्शनानंतर घेतला 'राऊतांचा चहा'

देवेंद्र फडणवीस यांनी कुलदैवताच्या दर्शनानंतर घेतला 'राऊतांचा चहा'

देवेंद्र फडणवीस.. नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारलेले व्यक्तिमत्व..

  • Share this:

मधुकर गलांडे,(प्रतिनिधी)

इंदापूर,8 डिसेंबर:मैत्रीचे किस्से आपण ऐकत असतो. अशीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरा नरसिंहपूर इथल्या चहावाल्याची मैत्री. इंदापूर आणि बारामती परिसरातील चर्चेचा विषय आहे. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री न चुकता येथील दशरथ राऊत या चहावाल्याचा चहा घेतल्याशिवाय पुढील प्रवास करत नाहीत.

देवेंद्र फडणवीस.. नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारलेले व्यक्तिमत्व.. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी विविध पदे भूषवली. आज ते राज्याचे  विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र, त्यांचे जुन्या कालापासून असलेले ऋणानुबंध आजही कायम असल्याचे दिसते. इंदापूर तालुक्यातल्या निरा आणि भिमा नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर या गावी असलेले श्री लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस कुटुंबियांचे कुलदैवत. आहे. वर्षातून किमान एकदा तरी फडणवीस कुटुंबीय या मंदिरात दर्शनासाठी येतात.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर येथे आपल्या कुलदैवताची पूजा केली. या पूजेनंतर फडणवीस मंदिरातून बाहेर जात असताना पोलिस आणि लोकांच्या गराड्यातील एका सामान्य माणसाने त्यांना चहा पिण्यासाठी बोलवले. फडणवीस येथे आले असता राऊत यांच्या टपरी वजा हॉटेलात चहा घेतात. आजही ते आले आणि त्यांनी चहा घेतला.

काय म्हणाले हॉटेलचालक

मंदिरासमोर हॉटेल चालवणाऱ्या दशरथ  राऊत  यांनी सांगितले की, देवेंद्र फडणविस हे कुलदैवताला नेहमीच येत असल्याने त्यांच्याशी परिचय झाला. तेव्हापासून आजतागायत फडणवीस आणि राऊत यांच्यात एक प्रकारे जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय. त्यामुळंच देवेंद्र फडणवीस हे आज विरोधी पक्ष नेता पदावर असतानाही राऊत यांचा चहा पिणं सोडलेलं नाही. यातूनच  फडणवीस यांनी जपलेल्या मैत्रीची प्रचिती येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 10:03 PM IST

ताज्या बातम्या