मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

''काम कोणं करत आणि हार दुसरे घालून जातात'', पुणे मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावरुन अमृता फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला

''काम कोणं करत आणि हार दुसरे घालून जातात'', पुणे मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावरुन अमृता फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Amruta Fadnavis On Pune Metro: या उद्घाटनावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुणे, 05 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन पार पडली. अजित पवारांनी (Ajit Pwar) मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन केलं. या उद्घाटनावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

काम कोण करतं आणि हार दुसरे घालून जातात, असं म्हणत मेट्रो उद्घाटनावरुन अमृता फडणवीसांनी सत्ताधारांना टोला हाणला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुणे मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात एका हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली.

आता नवा वाद, राज्यपाल आणि महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष

पुण्यात 4 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असताना नियम आहेत कळत नाही. त्यामुळं येथे सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरात अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय, पुण्याला असं करू नये, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जाऊन म्हणा, पुणे उघडा, रस्त्यावर जावं लागतं. पुणं खुलं करण्याची वेळ आली आहे, असंही त्या म्हणाल्यात.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला खोचक असा टोला हाणला आहे. महाविकास आघडीतले पक्ष एकच काम चांगलं करतात ते म्हणजे एकमेकांची पाठ खाजवतात, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

First published:

Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis, Pune