पुणे, 15 ऑगस्ट : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मराठी पत्रकार संघ कोविड सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि पार्थ पवार यांची नाराजी अशा विषयांवर भाष्य केलं आहे. त्याबरोबरच त्यांनी महाविकासआघाडीच्या कारभारावरही गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. कोरोनाच्या कठीण काळात बदल्यांचा घाट कशाला घालायचा असा प्रश्नही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
सरकारला बदल्यांमुळे आर्थिक भुरदंड पडत असल्यामुळे बदल्यांची गरज नव्हती, असं मतही यावेळी फडणवीसांनी मांडलं. मला चुकीच्या बदल्या करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही, गरज पडली तर सोडून देईन, असं राज्याचे डीजी म्हणत असल्याच्या बातम्या समोर येत आहे, पण या गोष्टी अत्यंत गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले.
राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती
'देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत प्रकरणात केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी झालेली निवड, हा योगायोग आहे,' अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सुशांत केस आणि माझ्या बिहार नियुक्तीचा संबंध नाही. सुशांत प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांवर राजकीय दबाव आहे. एरवी महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं आहे, पण सुशात केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.'
दुसरीकडे यावेळी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्याबद्दलच्या वादाविषयी देखील प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं आहे. 'पार्थ पवारांचा विषय हा पवारांचा कौंटुबिक विषय आहे, त्यात आम्हाला पडायचं नाही,' असं ते म्हणाले.
धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या मुलीला पेटवलं
देवेंद्र फडणवीस यांच्या संवादातील ठळक मुद्दे:
- कोरोनाच्या या महामारीत आपण एका विचित्र परिस्थितीतून जातोय
- आता कोरोनाची भीती कमी झाली असली संकट कायम आहे, लस येईपर्यंत काळजी घेतलीच पाहिजे
- पत्रकारांसाठी कोविड सेंटर हा चांगला उपक्रम, पत्रकार पहिल्या दिवसापासून फिल्डवर आहेत... कोरोना बाधित पत्रकारांना उपचार मिळालेच पाहिजेत
- महाराष्ट्र हा कोरोनाची राजधानी झालाय, मृत्यूचं प्रमाण जास्त
काँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण
- ऑक्सिजन बेड्स वाढवा, पुण्यात पीटी पीसीआर टेस्ट वाढवाव्यात
- संसर्गाचे प्रमाण कमी केले पाहिजे
- एन्टीजेन टेस्टची रिलायबिलिटी फारशी चांगली नाही... आरटीपीसीआर टेस्ट वाढवल्या पाहिजेत