Home /News /pune /

आकडे कमी दाखवण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा

आकडे कमी दाखवण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा

'पुण्यासारख्या शहरात चाचण्या वाढवण्याची व्यवस्था एवढ्या दिवसात का होऊ शकली नाही, चाचण्या दुप्पट करण्याची गरज असताना त्यांची संख्या वाढत का नाहीत?'

    पुणे, 23 जून :  पुण्यासारख्या शहरात चाचण्या वाढवण्याची व्यवस्था एवढ्या दिवसात का होऊ शकली नाही, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर Coronavirus चे रुग्ण वाढू लागले आहेत. त्याची व्यवस्था काय आहे? दिल्लीत चाचण्यांचा वेग वाढतोय, मुंबईत का नाही? चाचण्या दुपटीने वाढवणं ही आजची गरज असताना कोरोनारुग्णांची संख्या कमी दाखवण्याच्या नादात राज्य सरकार चाचण्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करत आहे का, असे थेट प्रश्न सरकारला विचारत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. आकडे कमी दाखवण्याच्या नादात राज्यात टेस्टिंग प्रोटोकॉल तयार केले नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. ते आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या आपण सोलापूरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक! मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता जुलै- ऑगस्ट या महिन्यात कोरोनारुग्णांचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. त्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था किती सज्ज आहे? वाढीव बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज निर्माण होईल त्याची सोय आहे का याचा आढावा आपण घेतला, असं फडणवीस म्हणाले. 'खासगी रुग्णालयाचं शुल्क ठरवून घ्यावं' 'खासगी रुग्णालयात एकाच कुटुंबातले दोघे-तिघे दाखल झाले, तर दिवाळी निघेल अशी अवस्था आहे. खासगी रुग्णालयासंदर्भातला सरकारने आदेश (GR) काढला. 80 टक्के खाटा कोरोनारुग्णांसाठी सरकारला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. पण प्रत्यक्षात या खासगी रुग्णालयात खाटांची सोय होतेय का हे पाहायला काही सरकारची व्यवस्था नाही.  खासगी रुग्णालयातल्या चार्जेसचा एकत्रित विचार करून ते शुल्क ठरवून घेतलं पाहिजे', अशी मागणी त्यांनी केली. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत, असंही ते म्हणाले. केजरीवालांच्या दिल्लीत नव्हे, महाराष्ट्राच्या मुंबईतच आहे Corona चा वाढता धोका; पुण्यात चाचण्या का कमी? पुण्यासारख्या शहरात चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी काय अडचण आहे, हे समजलं पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि वित्तमंत्रीसुद्धा आहेत. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालावं. कोरोनारुग्ण वाढत आहेत, तशी चाचण्यांची संख्याही वाढवण्याची आवश्यकता आहे. जगभरात हेच मॉडेल वापरलं जात आहे. या साथीशी सामना करायचा तर खरा आकडा, खरे रुग्ण समोर यायलाच हवेत, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं . संकलन, संपादन - अरुंधती
    First published:

    Tags: Coronavirus, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या