...आणि मुलींमध्ये राज्यात प्रथम येऊनही उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील झाल्या ट्रोल

...आणि मुलींमध्ये राज्यात प्रथम येऊनही उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील झाल्या ट्रोल

राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या डेप्युटी कलेक्टर पर्वणी पाटील झाल्या ट्रोल, 'हे' आहे कारण

  • Share this:

पुणे, 22 जून : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 2019 वर्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात सध्या उपजिल्हाधिकारी असलेल्या पर्वणी पाटील राज्यात मुलींमध्ये प्रथम आल्या. मात्र आता त्यांना ट्रोल केलं जात आहे ते, त्यांनी पुन्हा परीक्षा दिल्यामुळं. काहींच्या मते प्रसिध्दी मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा परीक्षा दिल्याचे म्हटलं जात आहे की तर काहींनी उच्च पदाचा हव्यास. मात्र पर्वणी पाटील यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

सकाळ वृत्तपत्राशी बोलताना पर्वणी पाटील यांनी, दोन वेळा एकाच पदावर निवड होणं हा माझ्यावरचा अन्याय आहे. असं म्हणाल्या. पर्वणी या नागपूर येथे परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. याआधी दिलेल्या परीक्षेत त्या राज्यात महिलांमधून तिसरा क्रमांक आला होता. त्यामुळं त्यांच्यावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे सगळं केल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा-मटका व्यावसायिकाचा मुलगा बनला नायब तहसीलदार, मृत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!

पर्वणी यांची 2017मध्ये तहसीलदार म्हणून निवड झाली. 2017च्या परीक्षेचा निकाल खर तर 2018च्या अखेरील लागला. त्यामुळं निवड झालेल्या सर्वांचे ट्रेनिंग उशीरा झाले. सकाळशी बोलताना पर्वणी पाटील यांनी, "आरक्षाचा घोळ सुरू असल्यामुळं जॉइनिंग उशिरा झालं. परिणामी 2017मध्ये त्यांना तहसीलदार पद मिळालं. म्हणून उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या पर्वणी यानी 2018मध्ये पुन्हा परीक्षा दिली. त्यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी पदासाठी अर्ज केला होता. मात्र 2018च्या मुख्य परीक्षेत त्यांना समाधानकारक गुण मिळाले नाही.

त्यानंतर 2019मध्ये त्यांनी पूर्वपरिक्षा दिली, त्यात मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्या. यावेळीही त्यांनी केवळ उप-जिल्हाधिकारी पदाला प्राधान्य दिलं होतं. मात्र त्यानंतर एका कोर्टाच्या निकालानं सर्वांचं नशीब बदललं. मुलींच्या आरक्षणासंदर्भातील एका निकालामुळं पर्वणी तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी झाल्या.

वाचा-कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत झळकला दुसऱ्या क्रमांकावर

मात्र तरी, पर्वणी यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. कारण काही उमेदवारांनी या निर्णयाविरुद्ध कोर्टात दाद मागितली. त्यामुळं त्याचे पद जर तरमध्ये अडकलं. त्यामुळं त्यांना हे पद जाण्याची भीती होती. 2019च्या मुलाखतीआधी त्यांच्या घरी कोर्टाची नोटीस आली. मात्र पर्वणी यांनी या सगळ्याचा सामना करत अभ्यासाच्या जोरावर आपलं पद मिळवलं. मात्र त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे.

वाचा-जिद्दीला सॅल्युट! शेतकऱ्यांची लेक बनली तहसीलदार, जावई सीमेवर करतोय देश सेवा

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 22, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading