पुणे, 10 ऑक्टोबर: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान एका घटनेनं भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सध्या आयकर विभागाकडून (Income Tax Raid) धाडीसत्र सुरु आहे. आयकर विभागानं अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर, पुत्र पार्थ पवार (Parth Pawar), जवळच्या नातेवाईकांच्या धाडी टाकल्या आहेत. त्यानंतर त्यांचा आज पहिलाच बारामती दौरा होता. यात आयकर विभागानं पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नंदूरबार आणि मुंबईत धाडी मारल्या.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन झालं. यावेळी उपस्थित महिलांनी अजित पवारांचं कौतुक केलं.
हेही वाचा- जळगावमध्ये भाजपसाठी Good News तर शिवसेनेसाठी Bad News
अजितदादा तुमचं काम एक नंबर आहे. तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा, आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत, असे या महिलांनी म्हटलं. महिलांनी अजित पवारांचं कौतुक करताच अजित पवार भावूक झाले आणि त्यांनी हात जोडून महिलांचे आभार मानले.
तुम्ही निवडून देता म्हणून मी काम करतो, असं म्हणत अजित पवारांनी हात जोडून आभार मानलेत.
हेही वाचा- ''तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय'', नाशकात लॉजवर नेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कोरोनाचे नियम पाळा अन्यथा गेला गेला कोरोना आला आला कोरोना असं होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. मी फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क काढतो. गेला गेला कोरोना तर आला आला कोरोना अस होईल. मी अर्थ मंत्री आहे मला आर्थिक विकास कामांचा निधी कोरोनाला वळवावा लागतो. यामुळे मास्कचा वापर करा आणि कोरोनाचे नियम पाळा, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP