मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

अजितदादा भडकतात तेव्हा.. पुण्यातील VVIP रेस्ट हाऊसमधून कोरोना योद्धांना काढलं बाहेर

अजितदादा भडकतात तेव्हा.. पुण्यातील VVIP रेस्ट हाऊसमधून कोरोना योद्धांना काढलं बाहेर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसारच प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसारच प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसारच प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुणे, 22 जून: पुण्यातील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊसमध्ये कोरोना रुग्णांनावर उपचार करणारे 20 कोरोना योद्धा डॉक्टरांना ठेवण्यात आलं आहे. मात्र, याबाबत माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड संतापले. या मुद्द्यावरून त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. नंतर रेस्ट हाऊसमध्ये थांबलेल्या कोरोना योद्धा डॉक्टरांना तडकाफडकी इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा... महापौरविरुद्ध आयुक्त वाद पेटला! तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसारच प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हे रेस्टहाऊस फक्त सीएम, डीसीएम आणि उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीच राखीव असलं तरी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात कोविड योद्ध्याच्या जीवाचं काही मोल आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांची सारवासारव... दुसरीकडे, मात्र या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सारवासारव करताना दिसत आहे.  रेस्ट हाऊस ग्रीन झोनमध्ये आहे. त्यात रेस्ट हाऊसमध्ये सेंट्रल एसी आहे.  त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्याने डॉक्टरांना इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांनी दिली आहे. पण यानिमित्ताने ससूनच्या कोविड योद्ध्यांच्या निवासाची परवड अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे. सध्याच्या महामारीच्या काळातील कोविड योद्ध्यांचं योगदानाचं ही मोल आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या टर्ममध्ये पुण्यात कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा असलेलं व्हीव्हीआयपी रेस्टहाऊस बांधलं होतं. विशेष म्हणडे रेस्ट हाऊसच्या टेरेसवर हेलिपॅड देखील आहे. अजित पवार दोन दिवसांपूर्वी पुण्यात आले असता कोरोना महामारीच्या काळात प्रशासनानं परस्पर कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हे व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस दिल्यानं त्यांना समजलं. यामुळे अजित पवार प्रचंड संतापले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीट खरडपट्टीही काढली. हेही वाचा...प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश; आरोग्यमंत्री 24 तासांत आले ICU मधून बाहेर दोन दिवसांत व्हीव्हीआयपी रेस्ट रिकामं करण्याचे आदेश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं समजतं. या आदेशानुसार कोरोना योद्धा डॉक्टरांना तडकाफडकी इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुण्यात 600 कोविड योद्धे शहरातील रेस्टहाऊस, हॉटेल्समध्ये राहत आहेत.
First published:

Tags: #Pune, Ajit pawar, Corona, Coronavirus, Pune news

पुढील बातम्या