पिंपरी चिंचवड, 10 ऑगस्ट : कोरोनामुळे (coronavirus) शाळा-महाविद्यालये खुली करण्यात आली नाही आहेत. यामुळे बहुतेक सर्वच राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा (last year exam) रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आहे. यातच पुण्यातील दंतवैद्यकीय कॉलेजमधील (dental college) विद्यार्थ्यांना 2 आठवड्यांसाठी क्वारंटाइन (quarantine) होऊन परीक्षा देण्यास सांगितले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या 150 विद्यार्थ्यांची पुढच्या महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे.
डेक्कन हेराल्डनं दिलेल्या वृत्तानुसार, पिंपरी चिंचवडमधील एका दंतवैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला येणाऱ्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यासही सांगितले आहे, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच, पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी दोन आठवडे कॉलेजमध्ये क्वारंटाइन राहून परीक्षा देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. मात्र कॉलेज प्रशासनाने, कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगत, मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन परीक्षा केंद्र सॅनिटायझ करण्यात येणार असल्याचे सांगितले.
वाचा-देशात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत 62 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
पदव्युत्तर दंत चिकित्सक विद्यार्थ्यांची ही परीक्षा खर तर याआधी घेण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मात्र आता विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कॉलेजमध्ये क्वारंटाइन राहून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणारी परीक्षा द्यावी, असे सांगितले आहे.
वाचा-राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक, तब्बल 13,348 जणांना डिस्चार्ज
दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक दिसत आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या पाहता, अशा परिस्थितीत परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. तरीही कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगितले आहे. कॉलेज प्रशासनाने प्रश्नपत्रिक आणि उत्तप पत्रिका सॅनिटाइज केल्या जातील, तसेच सर्व वर्ग सॅनिटाइज केले जातील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परीक्षा घेतल्या जातील असे सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेस दाखल होण्याआधी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.
वाचा-‘मिशन धारावी’ने करून दाखवलंच, 24 तासांमध्ये आढळले फक्त 5 कोरोना रुग्ण!
पिंपरी चिंचवडमध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 हजारांच्या घरात गेली आहे. तर 480हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे धोक्याचे ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.