पुणे, 27 एप्रिल: दीप्ती काळे (Deepti Kale) या महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital Pune) 8व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. दीप्ती काळे ही महिला मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होती. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. दीप्ती काळे हिच्यावर पुण्यातील नामवंत सराफासह अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच खंडणीचाही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीप्ती काळेवर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. तसेच तिला अटकही करण्यात आली होती.
वाचा: कोरोनाबाधित पतीची रात्री तब्येत खालावली, डॉक्टर पत्नीने AC च्या हवेतून दिला ऑक्सिजन, VIDEO
काही दिवसांपूर्वी दीप्ती काळे हिची कोविड चाचणी करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असलेल्या ससून रुग्णालयातील बाथरूमच्या खिडकीतून तिने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन पडल्याने दीप्ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
दीप्ती काळे हिने आत्महत्या केली की ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. दीप्ती काळे ही रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असावी आणि त्यावेळी ती खाली कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune, Suicide