• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मास्कमुळे दबलेला मूकबधिरांचा ‘संवाद’ होणारा खुला, कोर्टाने ऐकला पुण्यातील याचिकाकर्त्यांचा आवाज

मास्कमुळे दबलेला मूकबधिरांचा ‘संवाद’ होणारा खुला, कोर्टाने ऐकला पुण्यातील याचिकाकर्त्यांचा आवाज

Bombay high court

Bombay high court

मास्क लावल्यावर चेहरा झाकला जात असल्याने मूकबधिर नागरिकांना एकमेकांशी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यात अडथळे येत आहेत. हायकोर्टाच्या निर्णयामुळे आता या समस्येवर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:
पुणे, 22 जून : कोरोनापासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क (Mask) वापरणं गरजेचं आहे. मात्र या मास्कमुळे मूकबधिरांच्या (Deaf, Mute citizens) आयुष्यात गेल्या दीड वर्षांपासून एक वेगळीच समस्या निर्माण झालीय. त्यांची भाषा सांकेतिक असल्यामुळे मास्क लावल्यानंतर त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यात (Communication Issue due to mask) अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्या अॅड. रमा सरोदे  (Pune's petitioner Rama Sarode) यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आलं आहे. मूकबधिरांसाठी पारदर्शक पॅच असणारे विशेष मास्क (Special masks with transparent patch) तयार करायला कोविड टास्क फोर्सनं (Covid Task Force) मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयानंतर आदेश दिल्यानंतर आता मूकबधिरांसाठी खास प्रकारचे मास्क बनवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप असे मास्क बनवण्यासाठी कुणीही पुढे आलेलं नाही. दीड वर्षे खुंटला संवाद जगात कोरोना येऊन आता दीड वर्ष उलटलं आहे. या काळात मास्क वापरणं बंधनकारक असल्यामुळे मूकबधिरांची मोठी अडचण झाली होती. उच्च न्यायालयाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तातडीने कोविड टास्क फोर्सला ही समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आता समाज कल्याण विभागाने हे मास्क तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे वाचा - पुण्यातल्या या 3 बँकांनी मोडले नियम, RBI ने ठोठावला 23 लाखांचा दंड असा असेल मास्क मूकबधिर नागरिक एकमेकांशी संवाद साधताना हातांसोबत चेहऱ्याचा विशेषतः डोळे आणि ओठांचा वापर करतात. सांकेतिक भाषेत बोलण्यासाठी एकमेकांचा चेहरा दिसणं ही मुख्य गरज असते. मात्र मास्कमुळे नाक, ओठ, हनुवटी हा चेहऱ्याचा भाग लपत असल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे येत होते. महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, महाबळेश्वरमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस! यावर तोडगा म्हणून आता नाक आणि ओठ दिसू शकतील, अशा प्रकारचे पारदर्शक मटेरियल वापरून हे मास्क तयार केले जाणार आहेत. त्यामुळे मूकबधिर नागरिकांना कोरोनापासून संरक्षणही मिळेल आणि त्यांचा थांबलेला संवाद पुन्हा सुरु होऊ शकेल. ‘या’ बाबतीतही उशीर भारतात नियोजनाच्या अभावामुळे लसीकरणाच्या वेगाला खिळ बसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. त्याचबरोबर या संवेदनशील प्रश्नावर तोडगा शोधायलाही सरकारला उशीरच झाल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेत यापूर्वीच याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून मूकबधिर नागरिकांना पारदर्शक मास्क वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता भारतातही ही परवानगी मिळाल्यामुळे ‘देर आए, दुरुस्त आए’ अशा भावना मूकबधिर नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
Published by:Amol Joshi
First published: