Home /News /pune /

तहसीलदार संजय पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये, भीमा नदी पात्रात उद्ध्वस्त केल्या 13 बोटी

तहसीलदार संजय पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये, भीमा नदी पात्रात उद्ध्वस्त केल्या 13 बोटी

काही दिवसांपासून वाळू माफियांनी हायड्रोलिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत हौदोस घातला होता.

    सुमित सोनवणे, दौंड, 30 सप्टेंबर : दौंडच्या भीमा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून वाळू माफियांनी हायड्रोलिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत हौदोस घातला होता. त्यानंतर आता नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या महसूल पथकाने दौंड तालुक्यातील शिरापूर हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तेरा यांत्रिक हायड्रोलिक बोटी उध्दवस्त केल्या असून दौंडच्या पूर्व भागातील शिरापूर, मलठण, राजेगाव, वाटलूज नायगाव, खानोटा या गावच्या हद्दीत कारवाई केली आहे. वाळू माफियांनी दिवसरात्र वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला होता. नदीलगतच्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत होता. दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येत या माफियांचे आता कंबरडे मोडलं आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी देखील पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेत अवैध वाळू उपसा बंद करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. तहलसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडल अधिकारी अजित मोहिते, सुनील जाधव, विजय खारतोडे तसेच देऊळगाव राजे, दौंड, वरवंड मंडलातील तलाठी यांच्या पथकाने शिरापूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 10 फायबर व 3 सेक्शन अशा एकूण 13 यांत्रिक बोटी उद्ध्वस्त केल्या आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune news

    पुढील बातम्या