सुमित सोनवणे, दौंड, 28 नोव्हेंबर : पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ हद्दीमध्ये भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झाला आहे, तर कुटुंबातील अन्य 4 जण जखमी आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ हद्दीत सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने समोरील कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमध्ये प्रवास करणाऱ्या 60 वर्षीय पुरुषाचा जागीच ठार झाला आहे. संजय कुमार पोपटलाल असं मृत व्यक्तीचं नाव असून कुटुंबातील इतर सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर कंटेनरचालकाने वाहन तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच अपघाताचा पुढील तपास कुरकुंभ पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - तलवारबाजांचा दुसरा कारनामा उघड, महिला वनअधिकारीला फार्महाऊसमध्ये डांबलं
दरम्यान, राज्यातील विविध महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण नसल्यानेच असे अपघात होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.