पुणे, 14 ऑक्टोबर : राष्ट्रवादीच्या माजी महापौर जेष्ठ नगरसेविका मंगला कदम (Former NCP mayor and senior corporator Mangala Kadam) यांच्यासह त्यांचा पती, मुलगा आणि सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल (Filed a domestic violence case) करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगला कदम यांच्या दुसऱ्या मुलाची पत्नी तन्वी कुशाग्र कदम यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. (Pimpri-Chinchwad News)
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगला कदम यांच्यासह पती अशोक कदम, मुलगा कुशाग्र कदम, गौरव कदम, सून स्वाती कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला कदम यांनी त्यांच्या मुलाचा गंभीर आजार लपवून फसवणुकीसह मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार सुनेने केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. (daughter in laws shocking allegations against former NCP mayors Complaint lodged at Shivajinagar police station )
हे ही वाचा-पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी
त्याशिवाय मुल होण्यासाठी आयव्हीएफ पद्धतीचा प्रयोग केल्याचा आरोपीही सुनेने मंगला कदम यांच्यावर केला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेने मंगला कदम यांच्याविरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.