महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत.. यासाठी रस्त्यावर उतरले दलित कार्यकर्ते

महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत.. यासाठी रस्त्यावर उतरले दलित कार्यकर्ते

महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.

  • Share this:

सुमीत सोनवणे,(प्रतिनिधी)

दौंड,29 नोव्हेंबर: पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी दलित कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीसोबत मागील 20 वर्षांपासून असलेले जोगेंद्र कवाडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का नाही, याबाबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दौंड तालुक्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार जोगेंद्र कवाडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी दौंडमध्ये रस्त्यावर उतरून संत गाडगे बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांचे आंबेडकरी चळवळीत योगदान दिले असून त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

दरम्यान, महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी शिवसेनेचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजपासून महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या कारभाराला सुरुवात झालीय. पदभार स्वीकारण्याआधी उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. गुरुवारी देशभरातून आलेल्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रालयात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तळमजल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला अभिवादन केलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांचे कर्मचाऱ्यांनीही स्वागत केले. नेते आणि शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. त्यानंतर ठाकरे हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर गेले. याच मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं ऑफिस आहे. तिथे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातले शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 29, 2019, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading